
Ramakrishna Ghosh New CSK All Rounder: आयपीएल 2026 (IPL 2026) आता रंगात आलेली आहे. स्पर्धेच्या इतिहासातील दोन सर्वात यशस्वी संघ असलेल्या चेन्नई सुपर किंग्स व मुंबई इंडियन्स (CSKvMI) यांच्यातील हंगामातील दुसरा सामना चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात सीएसके (CSK) संघासाठी महाराष्ट्राच्या रामकृष्ण घोष (Ramakrishna Ghosh) याने पदार्पण केले. त्याचा रामकृष्णबद्दल आपण जाणून घेऊया.
Story Of CSK All Rounder Ramakrishna Ghosh
रामकृष्ण घोष याचा जन्म नाशिकचा. नाशिकमध्येच त्याने क्रिकेटचे धडे गिरवले. त्याला क्रिकेटचे बाळकडू पाजणारे प्रशिक्षक होते त्याचेच वडील शेखर घोष. व्यावसायिक प्रशिक्षक असलेल्या शेखर यांनी आपल्या मुलाला तयार करण्यात कसली कसर ठेवली नाही. भारतीय क्रिकेटमध्ये अगदीच विरळ असलेल्या वेगवान गोलंदाज अष्टपैलू या गटात रामकृष्ण येतो. वेगवान गोलंदाजी, खालच्या क्रमांकावर आक्रमक फटकेबाजी व चित्त्याच्या चपळाईने क्षेत्ररक्षण अशा त्याच्या खुबी आहेत.
रामकृष्ण याची कारकीर्द पुढे जाण्यासाठी त्याच्या वडिलांनी त्याला पुण्याला पाठवण्याचा निर्णय घेतला. तो 2018 मध्ये रेडबुल कॅम्पस क्रिकेट टूर्नामेंटमध्ये मराठवाडा मित्रमंडळ कॉलेज ऑफ कॉमर्स संघासाठी अफलातून कामगिरी करून गेला. त्यानंतर राष्ट्राच्या वयोगट क्रिकेटमध्ये त्याने पदार्पण केले व मागे वळून पाहिले नाही.
महाराष्ट्र क्रिकेट संघटनेने 2023 मध्ये महाराष्ट्र प्रीमियर लीग (Maharashtra Premier League) पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी आत्तापर्यंत असलेला रामकृष्ण अनेक संघांच्या रडारवर होता. भारतीय संघात खेळलेल्या ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) याच्या नेतृत्वातील पुणेरी बाप्पा संघात तो सामील झाला. संघाचा खरा थ्रीडी खेळाडू म्हणून त्याने आपली ओळख निर्माण केली. त्याच्या तीनही विभागात जबरदस्त योगदान देत त्याने आयपीएल संघांना आपली दखल घ्यायला भाग पाडले. याच दरम्यान त्याने ऋतुराजला आपला मेंटर म्हणून देखील निवडले.
हे देखील वाचा: कोण हा Raghu Sharma? वय 33, कृष्णभक्त, शेन वॉर्न आणि बरंच काही
दोन एमपीएल (MPL) हंगाम व देशांतर्गत क्रिकेटमधील कामगिरीच्या जोरावर सीएसकेने त्याच्यावर 30 लाखांची बोली लावली. विशेष म्हणजे यावेळी ऋतुराज पुन्हा एकदा त्याचा कर्णधार असणार होता. आयपीएल 2025 मध्ये त्याला खेळण्याची संधी मिळाली नाही. मात्र, अनुभव दांडगा मिळाला. त्याच्याच जोरावर त्याने पुन्हा एकदा एमपीएल हंगाम गाजवला. त्यानंतर झालेल्या देशांतर्गत हंगामात तो सर्वांच्या तोंडचे नाव बनला.
विजय हजारे ट्रॉफीच्या एका सामन्यात हिमाचल प्रदेशविरुद्ध 42 धावा देत त्याने 7 बळी टिपलेले. तर, पारंपारिक प्रतिस्पर्धी मुंबईविरुद्ध 27 चेंडूंमध्ये 64 धावांची खेळी केलेली. त्याचा याच कामगिरीनंतर आयपीएल 2026 मध्ये त्याला कधी संधी मिळणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र, अखेर चेन्नई संघ व्यवस्थापनाने सर्वात हाय व्होल्टेज सामन्यात त्याच्यावर विश्वास दाखवला दाखवला.
Latest Marathi Sports News
जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप
One comment
Pingback: Latest Sports News in Marathi । क्रीडा कॅफे ताज्या मराठी बातम्या । Cricket Live Score ।