Breaking News

“बाबर विराटच्या चप्पलीसारखाही नाही”, माजी क्रिकेटपटूचे वादग्रस्त विधान, वाचा नक्की काय म्हणाला…

virat babar comparison
Photo Courtesy: X

Virat Babar Comparison|भारतीय क्रिकेट संघाचा वरिष्ठ फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) व पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम (Babar Azam) यांची सातत्याने तुलना होत असते. बाबरने आपल्या कारकिर्दीत अनेक विक्रम नोंदवले आहेत. सध्याच्या घडीला तो पाकिस्तानचा सर्वोत्तम फलंदाज मानला जातो. मात्र, विराटसोबत होणाऱ्या त्याच्या बरोबरीवरून पाकिस्तानचा माजी फिरकीपटू दानिश कनेरिया (Danish Kaneria) भडकला आहे.‌

सध्या पाकिस्तान संघ टी20 विश्वचषक (T20 World Cup 2024) खेळतोय. स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात पाकिस्तानला दुबळ्या युएसएकडून (USA Beat Pakistan) पराभूत व्हावे लागले. या पराभवानंतर पाकिस्तान संघावर जोरदार टीका होत आहे. खेळाडू तसेच कोचिंग स्टाफला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात लक्ष केले गेले. अशातच एका मुलाखतीत कनेरिया याने आपला राग व्यक्त केला. तो म्हणाला,

“पाकिस्तान क्रिकेट आता हास्यास्पद होत चालले आहे. ते विश्वचषकाला अजिबात गांभीर्याने घेत नाहीत. संपूर्ण संघ फक्त अमेरिकेत फिरायला गेला आहे. यामुळे पाकिस्तान क्रिकेटला शरम येत आहे.”

बाबरला लक्ष करताना तो म्हणाला,

“एखादे शतक केल्यानंतर पाकिस्तान मीडियात बातम्या येतात की, बाबर आझम विराट कोहलीच्या बरोबरीचा आहे. मी म्हणतो त्याची जागा विराट कोहलीच्या पायातील चप्पलीची देखील नाही. युएसएच्या गोलंदाजांनी त्याला खेळू दिले नाही. स्वतःच्या 40-45 धावा झाल्या की तो बाद झाला. त्याने मोठी खेळी खेळायलाच पाहिजे होती.”

यूएसएविरुद्धच्या सामन्यात बाबर आझम याने 43 चेंडूंमध्ये फक्त 44 धावा केल्या होत्या. त्याच्या संथ खेळीमुळे पाकिस्तान संघाला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. पाकिस्तान 9 जून रोजी आपला दुसरा सामना भारताविरुद्ध खेळणार आहे.

(Danish Kaneria Speaks On Virat Babar Comparison)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version