Breaking News

नागपूरची Divya Deshmukh बनली 64 घरांची राणी! 19 व्या वर्षीच मिळवला जगज्जेती होण्याचा मान

divya deshmukh
Photo Courtesy: X

Divya Deshmukh Won FIDE Chess World Cup 2025: भारताची युवा बुद्धिबळपटू दिव्या देशमुख (Divya Deshmukh) हिने इतिहास रचला आहे. जॉर्जिया येथे झालेल्या फिडे चेस विश्वचषक स्पर्धेत भारताच्याच कोनेरू हंपी (Koneru Humpy) हिचा टायब्रेकरमध्ये पराभव करत विजेतेपद पटकावले. अवघ्या 19 व्या वर्षी विजेतेपद जिंकणारी दिव्या यासोबतच ग्रँडमास्टर देखील बनली.

Divya Deshmukh Won FIDE Chess World Cup 2025

हंपी व दिव्या यांनी उपांत्य फेरीत प्रवेश करत उपांत्य फेरीत पोहोचणाऱ्या पहिल्या भारतीय महिला बुद्धिबळपटू होण्याचा मान मिळवलेला. त्यानंतर त्यांनी अंतिम फेरीत देखील प्रवेश केला. टायब्रेकरपर्यंत झालेल्या या अंतिम सामन्यात दिव्याने विश्वविजेती होण्याचा मान मिळवला. ही स्पर्धा जिंकणारी ती सर्वात कमी वयाची बुद्धिबळपटू आहे.

पुरूष गटात भारतासाठी विश्वनाथन आनंद याने फिडे बुद्धिबळ जिंकण्याची कामगिरी दोनदा केली होती. त्याने 2002 व 2004 असे दोन वेळा विश्वविजेतेपद जिंकलेले.

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप

हे देखील वाचा: दिव्या की हंपी? भारतात कोण आणणार FIDE Chess World Cup 2025 ची ट्रॉफी?

Exit mobile version