Breaking News

विराटचे स्वप्न पूर्ण झाले! RCB ने उंचावली IPL 2025 ची ट्रॉफी, पंजाबच्या पदरी निराशा

IPL 2025
Photo Courtesy: X

RCB Won IPL 2025: जगातील सर्वात मोठी टी20 लीग असलेल्या इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएलचा 18 वा हंगाम मंगळवारी (3 जून) समाप्त झाला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू RCB) व पंजाब किंग्स यांच्या दरम्यान झालेल्या अंतिम सामन्यात आरसीबीने 191 धावांचा बचाव करत पहिल्यांदा ही स्पर्धा जिंकली. यासोबतच संघाचा अनुभवी फलंदाज व माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याचे आयपीएल जिंकण्याचे स्वप्न तब्बल 18 वर्षांनी पूर्ण झाले.

RCB Won IPL 2025

अंतिम सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर आरसीबीला प्रथम फलंदाजीची संधी मिळाली. फिल सॉल्ट लवकर बाद झाल्यानंतर विराट कोहली याने तीन 30 पेक्षा जास्तच्या भागीदाऱ्या बनवत संघाला सामन्यात जिवंत ठेवले. त्याने स्वतः 43 धावांची खेळी केली. तळाच्या फलंदाजांनी थोडेफार योगदान देत संघाला 190 परत नेले. पंजाबसाठी जेमिसन व अर्शदीप यांनी प्रत्येकी तीन बळी मिळवले.

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप

विजयासाठी मिळालेले 191 धावांचा पाठलाग करताना पंजाबने चांगली सुरुवात केली.

आरसीबी की पंजाब ? कोणाचा वनवास संपणार? वाचा IPL 2025 Final बद्दल सर्वकाही

Exit mobile version