Breaking News

RCB च्या यशाचा सूत्रधार Andy Flower! कोच म्हणून 5 वर्षात सगळंच कमावलं, वाचा काय-काय जिंकल?

ANDY FLOWER
Photo Courtesy: X

Andy Flower As Coach: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) संघाने आयपीएल 2025 (IPL 2025) चे विजेतेपद आपल्या नावे केले. पंजाब किंग्सला पराभूत करत त्यांनी आपली पहिली ट्रॉफी उंचावली. सर्व खेळाडूंनी शानदार सांघिक कामगिरी करत संघाचा विजय साकार केला. मात्र, संघाचे प्रशिक्षक ऍण्डी फ्लॉवर (Andy Flower) यांनी देखील आपल्या कारकीर्दीतील चौथे टी20 लीग विजेतेपद जिंकले.

Andy Flower Carrier As Coach

झिम्बाब्वेचे माजी क्रिकेटर असलेल्या फ्लॉवर यांना क्रिकेटविश्वातील सर्वात प्रतिष्ठित प्रशिक्षकांपैकी एक मानले जाते. त्यांच्या नेतृत्वात इंग्लंडने 2010 मध्ये टी20 विश्वचषक जिंकत आपली पहिली आयसीसी ट्रॉफी पटकावली होती. त्यानंतर तीन वेळा इंग्लंडला ऍशेस जिंकून देण्यात त्यांचे मार्गदर्शन कामी आले. इंग्लंडने 2012 मध्ये भारतात येऊन कसोटी मालिकेत पराभूत करण्याचे कामगिरी त्यांच्याच मार्गदर्शनात केलेली.

टी20 लीग क्रिकेटमध्ये देखील त्यांचा जलवा तसाच राहिला. फ्लॉवर प्रशिक्षक असताना मुलतान सुलतानने 2021 मध्ये पाकिस्तान सुपर लीग जिंकली. त्यानंतर 2022 मध्ये ट्रेंट रॉकेट्सला पहिल्या द हंड्रेड लीगचे जिंकवून दिले. त्याच्या पुढच्या वर्षी इंटरनॅशनल लीग टी20 चे विजेतेपद गल्फ जायंट्सच्या नावे करून दिले.

या व्यतिरिक्त कॅरेबियन प्रीमियर लीगच्या दोन अंतिम सामन्यात सेंट लुसिया किंग्सला पोहोचवलेले. तर, आयपीएलमध्ये लखनऊ सुपरजायंट्सला दोनदा आणि आरसीबीला एकदा प्ले ऑफ्समध्ये नेले होते.

Andy Flower Carrier As Coach

Exit mobile version