Breaking News

कोण आहेत RCB सोबत 18 वर्ष लॉयल राहिलेले Mane Kaka? ज्यांच्यासाठी टीमने थांबवला जल्लोष

MANE KAKA
Photo Courtesy: X

Who Is Mane Kaka In RCB: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) संघाने आयपीएल 2025 (IPL 2025) ची ट्रॉफी जिंकली. तब्बल 18 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर ते आपले पहिले विजेतेपद जिंकण्यात यशस्वी झाले. खेळाडू म्हणून विराट कोहली (Virat Kohli) हा एकमेव असा खेळाडू आहे ज्याने सर्व 18 हंगाम आरसीबीसाठी खेळले. मात्र, आरसीबीच्या सपोर्ट स्टाफमध्ये देखील एक अशी व्यक्ती आहे, जी विराटप्रमाणे सलग 18 वर्ष आरसीबीचा भाग राहिले. परंतु, ती व्यक्ती नक्की आहे कोण? 

Masseur Ramesh Mane Kaka Won With RCB

विराटप्रमाणे आरसीबीचा भाग असलेली ही व्यक्ती म्हणजे रमेश माने उर्फ माने काका आहेत. ते पहिल्या हंगामापासून आरसीबीचे मसाज थेरीपिस्ट म्हणून काम पाहतात. आरसीबीने आपली पहिली ट्रॉफी जिंकल्यानंतर खेळाडूंनी आपले सेलिब्रेशन थांबवत माने काकांना ट्रॉफी उचलण्याची संधी दिली.

वयाच्या सत्तरीत असलेले माने काका हे अनेक क्रिकेटपटूंचे लाडके आहेत. त्यांनी 2005 मध्ये भारतीय संघात मसाजर म्हणून काम करण्यास सुरुवात केली होती. नवी मुंबईच्या वाशी येथील रहिवासी असलेल्या माने काका यांनी तब्बल दहा वर्ष भारतीय संघासोबत काम केले. सचिन तेंडुलकरपासून विराट कोहलीपर्यंत अनेक दिग्गज क्रिकेटपटूंचे ते आवडते मसाजर राहिले आहेत. आयपीएलची सुरुवात झाल्यानंतर 2008 मध्ये त्यांनी आरसीबीसाठी काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर अवघ्यात पण येते आजपर्यंत आरसीबी संघाचा भाग आहेत.

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप

(Masseur Ramesh Mane Kaka Won With RCB)

हे देखील वाचा: RCB च्या यशाचा सूत्रधार Andy Flower! कोच म्हणून 5 वर्षात सगळंच कमावलं, वाचा काय-काय जिंकल?

RCB च्या विजयानंतर बंगळुरूमध्ये दिवाळी, 3 जूनच्या रात्रीचा व्हिडिओ तुफान व्हायरल

Exit mobile version