Breaking News

भारतीय चेस इतिहासातील सोनेरी दिवस! Chess Olympiad 2024 मध्ये भारताच्या दोन्ही संघांना गोल्ड

chess olympiad 2024
Photo Courtesy: X

Chess Olympiad 2024: हंगेरीची राजधानी बुडापेस्ट येथे झालेल्या 45 व्या फिडे चेस ऑलिम्पियाड (FIDE Chess Olympiad 2024) स्पर्धेत भारताच्या महिला व‌ पुरुष संघांनी ऐतिहासिक सुवर्णपदके जिंकली. भारताच्या पुरुष संघाने खुल्या गटात प्रथमच सुवर्णपदक जिंकण्याची कामगिरी नोंदवली.

FIDE Chess Olympiad 2024 India Won Double Gold

भारतीय पुरुष संघाने खुल्या गटातील अकराव्या फेरीच्या सामन्यात स्लोव्हेनियाविरूद्ध विजय मिळवून सुवर्णपदक निश्चित केले. तर महिला संघाने अझरबैजानला पराभूत करून, सुवर्णपदक पटकावले. दोन्ही गटात विजेतेपद पटकावण्याची भारताची ही पहिलीच वेळ आहे.

भारताच्या पुरुष संघात विदीत गुजराती, अर्जुन इरिगसी, आर. प्रज्ञानंद, पेंटल हरेकृष्णा व डी गुकेश यांचा समावेश होता. तर महिला संघात दिव्या देशमुख (Divya Deshmukh), डी हरीका, तानिया सचदेव, वैशाली रमेशबाबू व वंतिका अग्रवाल यांचा समावेश होता. भारतीय संघाच्या या यशानंतर त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे ‌

(India Women’s And Men’s Open Won Gold In FIDE Chess Olympiad 2024)

Duleep Trophy 2024 इंडिया ए कडे! ऋतुराजच्या संघाची अखेरच्या क्षणी हाराकिरी

Exit mobile version