Breaking News

INDvBAN Warm Up| पंत-पंड्याचा बांगलादेशवर प्रहार! सराव सामन्यातच टीम इंडियाचे फलंदाज ‘इनफॉर्म’

indvban warm up
Photo Courtesy: X/BCCI

INDvBAN Warm Up| 2024 टी20 विश्वचषक (2024 T20 World Cup) स्पर्धेआधी भारत आणि बांगलादेश (INDvBAN) यांच्या दरम्यान सराव सामना खेळला गेला. न्यूयॉर्क येथील नॅसू काऊंटी येथे झालेल्या या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना 182 धावा उभारल्या. भारतीय संघासाठी रिषभ पंत (Rishabh Pant) आणि हार्दिक पंड्या (Hardik Pandya) यांनी आक्रमक फटकेबाजी केली.

मुख्य स्पर्धेत भारतीय संघ हा एकमेव सराव सामना खेळला. रोहित शर्मा याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. या सामन्यात त्याच्यासह संजू सॅमसन याने सलामी दिली. मात्र, संजू केवळ एक धाव काढून बाद झाला. तब्बल दीड वर्षानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करत असलेल्या रिषभ पंत याला तिसऱ्या क्रमांकावर बढती देण्याचा निर्णय योग्य ठरला. त्याने फक्त 32 चेंडूत 53 धावांची वादळी खेळी केली. यात प्रत्येकी चार चौकार व चार षटकारांचा समावेश होता. कर्णधार रोहितने 23 धावांचे योगदान दिले.

त्यानंतर सूर्यकुमार यादव याने  18 चेंडूवर 31 धावा केल्या. आयपीएलमध्ये खराब फॉर्ममध्ये असलेल्या उपकर्णधार हार्दिक पंड्या याने यावेळी संधी साधताना फटकेबाजी केली. त्याने फक्त 23 चेंडूवर 40 धावांची खेळी केली. त्याने 17 व्या षटकात सलग तीन षटकार ठोकले. त्याच्या या खेळीमुळे भारताने 182 चांगली धावसंख्या उभी केली. बांगलादेश संघाने यावेळी आठ गोलंदाजांचा वापर केला.

(INDvBAN Warm Up Hardik Pandya And Rishabh Pant Hit In 2024 T20 World Cup Warm Up)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version