Breaking News

Joe Root एकटा बास! भारताविरुद्ध अशी कामगिरी करणारा बनला जगातील एकमेव फलंदाज

joe root
Photo Courtesy: X

Joe Root Complete 3000 Test Runs Against India: इंग्लंड आणि भारत (ENG vs IND) यांच्या दरम्यान लॉर्ड्स (Lords Test) येथे तिसरा कसोटी सामना खेळला जात आहे. सामन्याच्या पहिल्या दिवशी इंग्लंडचा अनुभवी फलंदाज जो रूट याने इंग्लंडचा डाव सावरला. आपल्या या खेळी दरम्यान त्याने भारताविरुद्ध एक मोठा टप्पा गाठला.

Joe Root Complete 3000 Test Runs Against India

उभय संघांमध्ये होत असलेल्या या सामन्याच्या पहिल्या दिवशी इंग्लंडला बेन डकेट व झॅक क्राऊली यांनी 43 धावांची सलामी दिली. त्यानंतर दोघेही एकाच षटकात बाद झाले. त्यानंतर मैदानावर उतरलेल्या जो रूट याने शानदार फलंदाजी करत अर्धशतक झळकावले. यादरम्यान त्याने भारताविरुद्ध कसोटीत 3000 धावा पूर्ण केल्या. भारताविरुद्ध अशी कामगिरी करणारा तो जगातील पहिला फलंदाज ठरला. यासाठी त्याने 60 डाव घेतले. यामध्ये 13 अर्धशतके व 10 शतके आहेत. (Latest Cricket News)

या यादीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉंटिंग असून त्याने भारताविरुद्ध 2555 धावा केल्या होत्या. इंग्लंडचाच माजी कर्णधार ऍलिस्टर कूक 2431 धावांसह तिसऱ्या व ऑस्ट्रेलियाचा अनुभवी फलंदाज स्टीव्ह स्मिथ 2356 धावांसह चौथ्या क्रमांकावर काबीज आहे.

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप

हे देखील वाचा: For 60 Overs They Should Feel Like Hell Out There… जेव्हा विराटच्या एका वाक्याने Lords Test मध्ये चवताळली टीम इंडिया, वाचा संपूर्ण स्टोरी

Lords Cricket Ground लाच का म्हणतात क्रिकेटची पंढरी? काय सांगतो 148 वर्षांचा इतिहास ? वाचाच

Exit mobile version