Breaking News

WCL 2024: इंडिया चॅम्पियन्सचा पाकिस्तान चॅम्पियन्सविरूद्ध पराभव! अकमल-शारजिल जोडीची तुफान फटकेबाजी

WCL 2024
Photo Courtesy: X/ Wasim Akram

WCL 2024: इंग्लंड येथे सुरू असलेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजेंड्स (World Championship Of Legends) स्पर्धेत शनिवारी (6 जुलै) इंडिया चॅम्पियन्सविरूद्ध पाकिस्तान चॅम्पियन्स (INDC vs PAKC) असा सामना खेळला गेला. बर्मिंगहॅम येथे झालेल्या या सामन्यात इंडिया चॅम्पियन्स संघाला 68 धावांनी लाजिरवाणा पराभव पत्करावा लागला. पाकिस्तान चॅम्पियन्ससाठी सलामीवीर कामरान अकमल व शारजिल खान यांनी ठोकलेली अर्धशतके निर्णायक ठरली.

 

‌(Pakistan Champions Beat India Champions In WCL 2024)

Exit mobile version