Breaking News

IND vs SA Final: भारतीय चाहत्यांच्या पूजा-प्रार्थना सुरू; पाहा देशभरातील व्हिडिओ एकत्रच

IND vs SA Final
Photo Courtesy: X

IND vs SA Final: टी20 विश्वचषक 2024 (T20 World Cup 2024) चा अंतिम सामना काही तासांवर आलेला आहे. अंतिम सामन्यात भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) एकमेकांसमोर येतील. दोन्ही संघ आतापर्यंत या स्पर्धेत पराभूत झालेले नाहीत. त्यामुळे अंतिम सामना रंगतदार होण्याची शक्यता आहे. भारतीय संघ तब्बल 17 वर्षानंतर या स्पर्धेचे विजेतेपद मिळवण्यासाठी आतुर असेल. त्यामुळे भारतीय क्रिकेट चाहते (Indian Cricket Fans) देखील देशभरात आपल्या संघाच्या विजयासाठी प्रार्थना करत आहेत.

भारतीय संघ दहा वर्षानंतर टी20 विश्वचषकात अंतिम सामना खेळतोय. तसेच विराट कोहली व रोहित शर्मा यांचा हा अखेरचा टी20 विश्वचषक असण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्या दोघांना विजेतेपदाची भेट देण्याचा भारतीय संघाचा मानस असेल. संघ मैदानात मेहनत घेत असताना, भारतीय चाहते प्रार्थना करत संघासाठी वरदान मागताना दिसतायेत.

मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिरात भारताच्या विजयासाठी अनेक चाहत्यांनी रांग लावलेली दिसली. शनिवारी बऱ्यापैकी या मंदिरात भारतीय चाहते दिसून आले. तसेच प्रयागराज येथे भारतीय संघाच्या विजयासाठी विशेष पूजा आयोजित केली गेली होती. पटना येथे सामूहिक हनुमान चालीसा म्हटली गेली. तर, कानपूर येथे देखील चाहत्यांनी भारतीय संघाच्या विजयासाठी मंदिरात जाऊन प्रार्थना केली.

भारतीय संघ या स्पर्धेत आतापर्यंत अजिंक्य राहिला आहे. दुसऱ्या बाजूला दक्षिण आफ्रिका देखील एकही सामना हरलेली नाही. दक्षिण आफ्रिकेला 1998 नंतर प्रथमच आयसीसी स्पर्धा जिंकण्याची संधी असेल. तर भारत अकरा वर्षाचा वनवास संपवून आयसीसी ट्रॉफी जिंकू शकतो.

(IND vs SA Final Indian Fans Offering Prayers For India Win In T20 World Cup 2024 Final)

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version