Breaking News

T20 World Cup 2024: अजिंक्य राहत टीम इंडियाने असा केला फायनलपर्यंतचा प्रवास, दक्षिण आफ्रिकेला विनिंग पंच देण्यासाठी तयार

T20 world cup 2024
Photo Courtesy: X/ICC

T20 World Cup 2024: टी20 विश्वचषक 2024 चा अंतिम सामना रविवारी (29 जून) खेळला जाणार आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) या अंतिम सामन्यात एकमेकांविरुद्ध खेळतील. भारत दहा वर्षानंतर तर दक्षिण आफ्रिका प्रथमच टी20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात (IND vs SA Final) खेळेल. दोन्ही संघ अजिंक्य रहा ईथपर्यंत पोहोचले आहेत. भारतीय संघाचा या स्पर्धेतील आतापर्यंतचा प्रवास कसा राहिला यावर एक नजर टाकूया.

साखळी फेरी-

साखळी फेरीत भारतीय संघाचा अ गटात समावेश होता. भारतीय संघाने साखळीतील आपले आव्हान आयर्लंडविरुद्ध सुरू केले. पहिल्या सामन्यात भारतीय संघाने आयर्लंड ला स्पर्धेतही उभे होऊ दिले नाही.‌ आयर्लंडला केवळ 96 धावांमध्ये गुंडाळल्यानंतर भारताने केवळ दोन गडी गमावत हे आव्हान पार केले. दुसऱ्या सामन्यात भारत पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध भिडला. फलंदाजांनी केवळ 119 धावा केल्यानंतरही, गोलंदाजांनी जबरदस्त कामगिरी करत संघाला 6 धावांनी विजय मिळवून दिला.

तिसऱ्या सामन्यात भारतासमोर यजमान युएसए उभी होती. गोलंदाजांनी सलग तिसऱ्या सामन्यात अप्रतिम कामगिरी करताना युएसए संघाचा डाव फक्त 110 धावांमध्ये संपवला. त्यानंतर आघाडीचे फलंदाज झटपट बाद झाल्यानंतरही भारताने सात गडी राखून सहज विजय संपादन केला. यासह भारताचे सुपर 8 मधील स्थान पक्के झाले. भारताचा अखेरचा कॅनडाविरुद्धचा साखळी सामना मात्र पावसामुळे होऊ शकला नाही.

सुपर 8-

साखळी फेरी गाजवल्यानंतर सुपर 8 मध्ये भारतासमोर मोठे आव्हान होते. अफगाणिस्तानविरुद्ध भारतीय फलंदाजांनी 181 धावांचे मोठे आव्हान उभे केले. त्यानंतर गोलंदाजांनी त्यांचा केवळ 134 धावांमध्ये फडशा पाडला. त्यानंतर बांगलादेशविरुद्ध देखील भारतीय संघाने आपला विजयरथ असाच कायम ठेवत 50 धावांनी दणदणीत विजय मिळवला. अखेरच्या सुपर 8 सामन्यात भारत मजबूत ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळत होता. कर्णधार रोहित शर्मा याने जबाबदारी खांद्यावर घेत संघाला प्रथमच या स्पर्धेत 200 पार नेले. त्यानंतर संघाने 24 धावांनी विजय मिळवत सलग चौथ्या टी20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला.

उपांत्य सामना-

उपांत्य सामन्यात भारतासमोर गतविजेत्या इंग्लंडने दंड थोपटले होते. मागील विश्वचषकात इंग्लंडनेच भारताला उपांत्य फेरीत पराभूत केलेले. सामन्यात भारतीय फलंदाजांनी प्रथम फलंदाजी करताना 171 धावा केल्या. यानंतर इंग्लंडचे फलंदाज भारतीय फिरकीपटूंसमोर अडखळले. इंग्लंडला तब्बल 68 धावांनी मात देत भारताने 2014 नंतर प्रथमच स्पर्धेची अंतिम फेरी गाठली.

(T20 World Cup 2024 Indian Cricket Team Road To Final)

IND vs SA Final : अंतिम सामन्याबरोबरच राखीव दिवशीही पावसाची दाट शक्यता, मॅच रद्द झाल्यास कोण जिंकेल ट्रॉफी?

7 comments

  1. Thanks for sharing. I read many of your blog posts, cool, your blog is very good.

  2. After study a few of the blog posts on your website now, and I truly like your way of blogging. I bookmarked it to my bookmark website list and will be checking back soon. Pls check out my web site as well and let me know what you think.

  3. I don’t think the title of your article matches the content lol. Just kidding, mainly because I had some doubts after reading the article.

  4. I don’t think the title of your article matches the content lol. Just kidding, mainly because I had some doubts after reading the article.

  5. Thank you for your sharing. I am worried that I lack creative ideas. It is your article that makes me full of hope. Thank you. But, I have a question, can you help me?

  6. he blog was how do i say it… relevant, finally something that helped me. Thanks

  7. very good publish, i actually love this web site, keep on it

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version