Breaking News

चॅम्पियन्स ट्रॉफी विजयाच्या शिल्पकाराच्या घरी आली ‘नन्ही परी’! पत्नीने दिला मुलीला जन्म

KL RAHUL
Photo Courtesy: X

KL Rahul & Athiya Blessed With Baby Girl: भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी फलंदाज केएल राहुल (KL Rahul) याच्या घरी आनंदाची बातमी आली आहे. त्याची पत्नी आथिया हिने सोमवारी (24 मार्च) मुलीला जन्म दिला. राहुलने सोशल मीडिया पोस्ट करत याबाबत माहिती दिली. 

KL Rahul & Athiya Blessed With Baby Girl

काही दिवसांपूर्वीच राहुल व अथिया यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करत आपल्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन होणार असल्याचे सांगितले होते. त्यानंतर आता सोमवारी मुंबई येथे आथिया हिने मुलीला जन्म दिला. मुलीच्या जन्मा वेळी आपल्या पत्नीसोबत राहण्याकरिता, राहुल याने आयपीएल 2025 मधील आपला पहिला सामना खेळला नाही. तो सकाळीच दिल्लीवरून थेट मुंबईला रवाना झाला होता.

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप 

राहुल यांनी नुकत्याच संपलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत भारतासाठी उत्कृष्ट कामगिरी केली होती. संघात यष्टीरक्षक व फिनिशर अशी दुहेरी भूमिका त्याने निभावली.

(KL Rahul & Athiya Blessed With Baby Girl)

हे देखील वाचा- मानलं तुला Shardul Thakur! अनसोल्ड राहिल्यानंतर केला ‘लॉर्ड’ कमबॅक

Exit mobile version