Breaking News

बिग ब्रेकिंग| R Ashwin चा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, 15 वर्षांच्या दैदिप्यमान कारकिर्दीची सांगता

r ashwin
Photo Courtesy: X

R Ashwin Announcement Retirement From International Cricket: भारतीय क्रिकेट संघाचा वरिष्ठ क्रिकेटपटू रविचंद्रन अश्विन (R Ashwin) याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. ब्रिस्बेन कसोटी संपल्यानंतर त्याने हा निर्णय जाहीर केला. यासह त्याच्या पंधरा वर्षाच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीची सांगता झाली.

ब्रिस्बेन कसोटीच्या अखेरच्या दिवसाचा खेळ पावसामुळे थांबला असताना, विराट कोहली याच्यासोबत बोलताना अश्विन भावूक झालेला दिसलेला. त्याने विराटला मिठी मारल्यानंतर, अश्विन निवृत्त होणार का अशी चर्चा सुरू झाली. त्यानंतर सामना संपल्याची अधिकृत घोषणा झाली. त्यानंतरच्या पत्रकार परिषदेत रोहित शर्मासह येत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपला हा शेवटचा दिवस असल्याचे सांगितले.

सध्या 38 वर्षांच्या असलेल्या अश्विनने 2010 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर 2011 मध्ये त्याने कसोटी पदार्पण केले. प्रमुख फिरकीपटू असण्यासोबतच त्याने वेळोवेळी फलंदाजीत आपले योगदान दिलेले. आपल्या दीड दशकाहून मोठ्या कारकिर्दीत त्याने 106 कसोटीमध्ये 537 बळी मिळवले. भारतासाठी त्याच्यापेक्षा अधिक बळी केवळ अनिल कुंबळे यांनी मिळवले आहेत. तसेच त्याने कसोटी क्रिकेटमध्ये 3503 धावा देखील काढल्या. वनडे क्रिकेटमध्ये 156 व टी20 मध्ये 72 बळी त्याच्या नावे आहेत. भारताने जिंकलेल्या 2011 वनडे विश्वचषक व 2013 चॅम्पियन्स ट्रॉफी विजेत्या संघाचा तो सदस्य होता.

अश्विन आगामी आयपीएलमध्ये मात्र खेळताना दिसेल. तो चेन्नई सुपर किंग्स संघाचा भाग असेल.

(R Ashwin Announced Retirement From International Cricket)

Exit mobile version