
Rajasthan Royals Announced New Head Coach: आयपीएल 2026 आधी सर्व संघांनी आपली तयारी सुरू केली आहे. रिटेन्शननंतर आता सर्व संघ लिलावाचे नियोजन करताना दिसत आहेत. मागील वर्षी काहीसा अडखळलेला राजस्थान रॉयल्स यावेळी नव्या ऊर्जेने खेळताना दिसू शकतो. त्याचाच भाग म्हणून त्यांनी आपल्या नव्या मुख्य प्रशिक्षकाची घोषणा केली आहे.
Rajasthan Royals Announced New Head Coach
राजस्थान रॉयल्सने आगामी हंगामासाठी श्रीलंकेचा माजी कर्णधार व राजस्थान रॉयल्सचा डायरेक्टर ऑफ क्रिकेट कुमार संगकारा याला मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्त केले. राजस्थान रॉयल्सचे सहमालक मनोज बदाले यांनी ही घोषणा केली. संगकाराने यापूर्वी देखील हा पदभार सांभाळला आहे. त्याच्याच मार्गदर्शनात राजस्थानने आयपीएल 2022 मध्ये अंतिम फेरीपर्यंत धडक मारली होती. आयपीएल 2025 पूर्वी भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविड याची मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केलेली. मात्र, संघाला या हंगामात आठव्या स्थानी समाधान मानावे लागलेले. त्यानंतर द्रविडने आपल्या पदाचा राजीनामा दिला होता.
संगकारा याच्या नियुक्तीनंतर बोलताना बदाले म्हणाले, “कुमारला पुन्हा एकदा रॉयल परिवारात आलेले पाहून आम्हाला आनंद होत आहे. तो या संपूर्ण वातावरणाशी जुळलेलाच होता. संघाला ज्या गोष्टींची आवश्यकता आहे ते तो सगळे देऊ शकतो. तो एक चांगला नेता असून त्याचे क्रिकेटचे ज्ञान, संयमीपणा व स्पष्टता याचा पुढील काळात संघाला नक्कीच फायदा होईल.”
रवींद्र जडेजा, सॅम करन व डोनावन फरेरा यांना ट्रेड करत राजस्थान रॉयल्सचा भाग बनवण्यात संगकाराची भूमिका निर्णायक राहिली होती.
Latest Sports News In Marathi
जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप
हे देखील वाचा: INDvSA: कसोटीत मामला झाला गंभीर! विरोधी संघांनी ओळखली टीम इंडियाची दुखरी नस