Breaking News

Rohit-Virat चे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पुनरागमन लांबणार? त्या 3 वनडेचा निर्णय भारत सरकारच्या कोर्टात

ROHIT-VIRAT
Photo Courtesy: X

Rohit-Virat International Cricket Comeback Might Delay: भारतीय क्रिकेट संघाचे अनुभवी क्रिकेटपटू रोहित शर्मा व विराट कोहली हे सध्या केवळ वनडे या क्रिकेटच्या एकाच प्रकारात भारताचे प्रतिनिधित्व करत आहेत. मागील वर्षी टी20 व मे महिन्यात कसोटी क्रिकेटमधून दोघांनी निवृत्ती जाहीर केले आहे. मात्र, या दोघांना एकत्रित आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळताना पाहण्याची चाहत्यांना ओढ लागलेली दिसते. मात्र, यासाठी आता चाहत्यांना मोठी वाट पाहायला लागू शकते. 

Rohit-Virat International Cricket Comeback Might Delay

भारतीय क्रिकेट संघ ऑगस्ट महिन्यात बांगलादेशचा दौरा करणार आहे. या दौऱ्यावर तीन सामन्यांची वनडे मालिका व तीन सामन्यांची टी20 मालिका खेळली जाईल. संपूर्ण मालिकेचा कार्यक्रम ठरलेला असताना, बीसीसीआयने आता या मालिकेचा अंतिम निर्णय भारत सरकारवर सोपवला आहे. बांगलादेशमधील राजकीय स्थिती पाहता बीसीसीआयने हा निर्णय घेतलेला दिसून येतो. या दौऱ्याची सुरुवात 16 ऑगस्ट पासून होणार होती.

बांगलादेश क्रिकेट बोर्डाच्या अध्यक्षांनी देखील या गोष्टीला दुजोरा दिलेला आहे. बीसीसीआयने अद्याप या दौऱ्यासाठी येणार की नाही, हे कळवले नसल्याचे त्यांनी सांगितले. ऑगस्ट महिन्यात हा दौरा न झाल्यास पुढील काळात हा दौरा पूर्ण होऊ शकतो असे देखील त्यांनी म्हटले.

रोहित व विराट या दौऱ्यासाठी न गेल्यास त्यांच्याकडे थेट ऑस्ट्रेलियात भारतासाठी खेळण्याची संधी असेल. सप्टेंबर महिन्यात भारतीय संघ वनडे व टी20 मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाला रवाना होईल. या दौऱ्यावर भारत तीन वनडे सामने खेळणार आहे. या मालिकेसाठीच्या तिकिटांची विक्री आत्ताच झाली असून, सर्व तिकिटे विकली गेल्याचे क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून सांगण्यात आले होते. रोहित व विराट या दोघांसाठी हा अखेरचा ऑस्ट्रेलिया दौरा असू शकतो. त्यासाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने देखील या दोघांचा सन्मान करण्याची यापूर्वीच घोषणा केली आहे.

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप

 हे देखील वाचा: Birmingham Test साठी इंग्लंडने जाहीर केली प्लेईंग 11, ‘त्या’ गोलंदाजाचे कमबॅक नाहीच

Exit mobile version