Breaking News

झिम्बाब्वेविरुद्ध Ruturaj Gaikwad याचा रुद्रावतार, पण अर्धशतक हुकल्याने नावावर झाला नकोसा विक्रम

Ruturaj Gaikwad : झिम्बाब्वेविरुद्धच्या तिसऱ्या टी20 सामन्यात भारताचा फलंदाज ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) याचा रुद्रावतार पाहायला मिळाला. झंझावाती फलंदाजी करत ऋतुराजने संघाची धावसंख्या 182 पर्यंत पोहोचवण्यात हातभार लावला. मात्र त्याच्या या वेगवान खेळीचा अंत नकोसा झाला. ऋतुराज त्याचे अर्धशतक पूर्ण करू शकला नाही. परिणामी शानदार खेळीनंतरही एक नकोसा विक्रम त्याच्या नावावर जमा झाला आहे. 

या सामन्यात नाणेफेक जिंकून भारतीय कर्णधार शुबमन गिलने प्रथम फलंदाजी निवडली. पहिल्यांदा फलंदाजी करताना भारतीय संघाने निर्धारित 20 षटकांत 4 बाद 182 धावा केल्या. यात कर्णधार शुबमन गिलच्या 66 धावांच्या खेळीचा समावेश होता. तसेच सलामवीर यशस्वी जयस्वाल यानेही 36 धावांचे योगदान दिले. तसेच चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला येत ऋतुराजनेही धडाकेबाज खेळ दाखवला. 20 चेंडूत 3 खणखणीत षटकार आणि 4 चौकार मारत त्याने 49 धावांची वेगवान खेळी केली. परंतु झिम्बाब्वेचा गोलंदाज मुजरबानीच्या चेंडूवर तो झेलबाद झाला आणि एका धावेने त्याचे अर्धशतक हुकले.

ऋतुराजचे अर्धशतक हुकल्यामुळे तो 49 धावांवर बाद होणारा तिसरा भारतीय फलंदाज ठरला आहे. ऋतुराजपूर्वी या यादीत विराट कोहली आणि माजी क्रिकेटपटू  एमएस धोनी यांचा समावेश आहे. विराट 2016 मध्ये पाकिस्तानविरुद्ध टी20 सामन्यात 49 धावांवर बाद झाला होता. तर धोनीचेही 2017 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध एका धावेने अर्धशतक हुकले होते.

Exit mobile version