Breaking News

बहुप्रतिक्षित Champions Trophy 2025 चे वेळापत्रक जाहीर, पाहा टीम इंडिया कुठे आणि कधी खेळणार?

champions trophy 2025
Photo Courtesy: X/ICC

Champions Trophy 2025: बहुप्रतिक्षित चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 (Champions Trophy 2025) स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. हायब्रीड मॉडेलनुसार होणाऱ्या या स्पर्धेचे आयोजन पाकिस्तान व दुबई येथे होईल. स्पर्धेचा पहिला सामना 19 फेब्रुवारी रोजी तर अंतिम सामना 9 मार्च रोजी खेळला जाईल. (Champions Trophy 2025 Schedule Announced)

Champions Trophy 2025 Schedule Announced

या स्पर्धेत एकूण आठ संघ सहभागी होतील. भारताचा समावेश अ गटात असून, या गटात पाकिस्तान, न्यूझीलंड व बांगलादेश हे संघ देखील असतील. तर ब गटात विश्वविजेते ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, अफगाणिस्तान व दक्षिण आफ्रिका आहेत. ही स्पर्धा अखेरच्या वेळी 2017 मध्ये इंग्लंड येथे झाली होती. पाकिस्तान संघाने या स्पर्धेचे विजेतेपद मिळवलेले.

भारतीय संघ आपल्या अभियानाची सुरुवात 20 फेब्रुवारी रोजी बांगलादेश येथे करेल. त्यानंतर 23 फेब्रुवारी रोजी पाकिस्तान व 2 मार्च रोजी अखेरचा साखळी सामना न्यूझीलंडविरुद्ध होईल. भारत आपले सर्व सामने दुबई येथे खेळेल. भारतीय संघ उपांत्य व अंतिम सामन्यासाठी पात्र ठरल्यानंतरही दुबई येथेच खेळणार आहे. पाकिस्तानमधील सामने लाहोर, कराची व रावळपिंडी येथे होतील.

(Champions Trophy 2025 Schedule Announced)

बिग ब्रेकिंग| R Ashwin चा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, 15 वर्षांच्या दैदिप्यमान कारकिर्दीची सांगता

Exit mobile version