![Shannon-Gabrial](https://kridacafe.com/wp-content/uploads/2024/08/Shannon-Gabrial.png)
क्रिकेट विश्वातून मोठी बातमी समोर येत आहे. वेस्ट इंडिज (West Indies) संघाचा वेगवान गोलंदाज शॅनन गॅब्रियल (Shannon Gabrial Retired) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला आहे. त्याने बुधवारी (दि. 28 ऑगस्ट) अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरून पोस्ट करत 12 वर्षांच्या कारकिर्दीचा शेवट केला आहे. त्याने अचानक हा निर्णय घेतल्यामुळे क्रिकेटप्रेमींच्या भुवया उंचावल्या आहेत. गॅब्रियलने 17 मे 2012 रोजी इंग्लंडविरुद्ध लॉर्ड्स कसोटीतून आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते.
शॅनन गॅब्रियल (Shannon Gabrial) याने त्याच्या कारकिर्दीत 59 कसोटी, 25 वनडे आणि 2 आंतरराष्ट्रीय टी20 सामनेही खेळले आहेत. यात त्याने कसोटीत 166 विकेट्स आणि वनडेत 33 विकेट्स घेतल्या आहेत. टी20 क्रिकेटमध्ये त्याने 3 विकेट्सही नावावर केल्या आहेत.
सोशल मीडियावर भावूक मेसेज
गॅब्रियल याने म्हटले की, “मागील 12 वर्षांदरम्यान मी स्वत:ला वेस्ट इंडिजकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यासाठी समर्पित केले होते. मोठ्या स्तरावर हा प्रिय खेळ खेळून मला खूप आनंद झाला आहे. मात्र, जसे म्हटले जाते, सर्व चांगल्या गोष्टींचा शेवट हा झालाच पाहिजे. आज मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून आपल्या निवृत्तीची घोषणा करत आहे.”
त्याने पुढे म्हटले की, “पुढे जाऊन माझी अशी योजना आहे की, मी माझा देश त्रिनिदाद आणि टोबॅगो, क्लब तसेच जगभरातील अनेक फ्रँचायझी संघांचे त्याच जोशात प्रतिनिधित्व करणे सुरू ठेवायचे आहे. जसे मी माझ्या संपूर्ण कारकिर्दीत केले आहे.”
वादाशी नाते
शॅनन गॅब्रियल याचे वादाशीही नाते राहिले आहे. 2019 मध्ये गॅब्रियलने इंग्लंडचा दिग्गज फलंदाज जो रूट याच्यावर समलैंगिकतेविरोधी टिप्पणी केली होती. त्यामुळे त्याला 4 वनडे सामन्यांसाठी निलंबित केले होते. या वादामुळे क्रिकेट जगतात खळबळ माजली होती. (Shocking News west indies Pacer Shannon Gabriel has announced his retirement from international cricket)
हे वाचलंत का?
Dawid Malan Retirement: इंग्लंडच्या नंबर 1 फलंदाजाची तडकाफडकी निवृत्ती, ऑस्ट्रेलियाविरुद्ध संधी न मिळाल्याने घेतला निर्णय
एकदम ‘झॅक’स! Zaheer Khan च्या खांद्यावर मोठी जबाबदारी, या निर्णयाचे होतेय कौतुक
One comment
Pingback: Latest Sports News in Marathi । क्रीडा कॅफे ताज्या मराठी बातम्या । Cricket Live Score ।