Breaking News

“वर्ल्डकप खेळल्यावर मला…” बीसीसीआय कॉन्ट्रॅक्टमधून बाहेर करण्याविषयी पहिल्यांदाच बोलला Shreyas Iyer

shreyas iyer
Photo Courtesy: X/Shreyas Iyer

Shreyas Iyer On BCCI Annual Contract Exclusion|भारतीय क्रिकेट संघाचा फलंदाज श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) सध्या राष्ट्रीय संघातून बाहेर आहे. विशेष म्हणजे त्याला बीसीसीआयच्या वार्षिक करारात (BCCI Annual Contract) देखील स्थान मिळाले नाही. असे असले तरी त्याच्या नेतृत्वातच कोलकाता नाईट रायडर्स (KKR) संघाने यंदा आयपीएल 2024 (IPL 2024) जिंकण्याचा कारनामा केला. त्यानंतर आता श्रेयस याने नुकतीच एक मुलाखत दिली असून, यामध्ये त्याने वार्षिक करार असताना मिळण्याबाबत प्रतिक्रिया दिल्या आहेत.

बीसीसीआयने फेब्रुवारी महिन्यात जाहीर केलेल्या वार्षिक करारात श्रेयस अय्यर व ईशान किशन या दोघांनाही स्थान दिले नव्हते. विशेष म्हणजे हे दोन्ही खेळाडू अवघ्या तीन महिन्यांपूर्वी संपलेल्या वनडे विश्वचषकात संघाचा भाग होते. त्यानंतर रणजी ट्रॉफी व कसोटी क्रिकेटमध्ये या दोघांनी रस दाखवला नाही अशी चर्चा होती. त्यानंतर त्यांना करारात स्थान दिले गेले नाही. यानंतरही श्रेयस रणजी ट्रॉफीच्या बाद फेरीच्या सामन्यात खेळताना दिसलेला. या संपूर्ण प्रकरणावर प्रतिक्रिया देताना श्रेयस म्हणाला,

“माझा विश्वचषक चांगला गेला होता. त्यानंतर मला थोडी विश्रांती घेत माझ्या शरीरावर आणि ताकद वाढवण्यावर काम करायचे होते. मात्र, योग्य संवाद न साधला गेल्याने काही निर्णय माझ्या विरोधात गेले. असे असले तरी शेवटी बॅट माझ्या हातात असते. त्यामुळेच मी चांगली कामगिरी करू शकतो आणि ट्रॉफी जिंकू शकतो.”

तो पुढे म्हणाला,

“मला माहित होत की, मी एकदा रणजी ट्रॉफी किंवा आयपीएल जिंकली की मागच्या अनेक प्रश्नांची उत्तरे मिळतील. नशिबाने अनेक गोष्टी योग्य घडल्या. भविष्यात आणखी चांगले कामगिरी आणि ट्रॉफी आम्ही जिंकू.”

श्रेयस अय्यरने 2023 वनडे विश्वचषकात उत्कृष्ट कामगिरी केली त्यानंतर रणजी ट्रॉफी जिंकणाऱ्या मुंबई संघाचा तो सदस्य होता. तर नुकतीच त्याने कर्णधार म्हणून आयपीएल देखील आपल्या नावे केली.

(Shreyas Iyer On BCCI Annual Contract Exclusion)

2 comments

  1. Precisely what I was searching for, thankyou for posting.

  2. What i don’t realize is if truth be told how you are no longer really much more smartly-preferred than you may be right now. You are very intelligent. You understand thus considerably in terms of this topic, made me personally believe it from numerous numerous angles. Its like men and women don’t seem to be involved except it¦s one thing to do with Lady gaga! Your personal stuffs nice. All the time take care of it up!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version