Breaking News

Unstoppable Smriti Mandhana! वनडेनंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी सामन्यातही ठोकले शानदार शतक

Smriti Mandhana Century :- तीन सामन्यांच्या वनडे मालिकेनंतर भारतीय महिला संघ चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर दक्षिण आफ्रिका महिला संघाविरुद्ध कसोटी सामना (INDW vs SAW Test Match) खेळत आहे. या सामन्यात भारताची सलामीवीर स्म्रीती मंधाना (Smriti Mandhana) हिने आपला चमकदार खेळ दाखवला. चौकार-षटकारांची आतिषबाजी दाखवत स्म्रीतीने शतक झळकावले आहे. स्म्रीतीचे हे कसोटी कारकिर्दीतील दुसरे शतक आहे.

भारतीय फलंदाज स्म्रीती ही सध्या कमालीच्या फॉर्ममध्ये आहे. तिने नुकतेच दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतही दोन शतके झळकावली आहेत. पहिल्या वनडेत तिने 117 धावा फटकावल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या वनडेत 136 धावांची शानदार खेळी करत सलग दुसरे शतक ठोकले होते. त्यानंतर पुढील तिसऱ्या सामन्यात तिने 90 धावांची खेळी केली होती. आता दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी सामन्यातही तिने आपला शानदार खेळ सुरू ठेवत शतक केले आहे. 161 चेंडूंचा सामना करताना 1 षटकार आणि 27 चौकारांच्या मदतीने तिने 149 धावा फटकावल्या आहेत.

याशिवाय भारताची सलामीवीर शेफाली वर्मा आणि स्म्रीतीमध्ये पहिल्या विकेटसाठी 292 धावांची भागीदारी झाली. ही महिला कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील पहिल्या विकेटसाठी झालेली सर्वोच्च भागीदारी आहे. शेफालीनेही दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आपले शतक पूर्ण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version