Breaking News

याला सातत्य ऐसे नाव! Steve Smith ने स्वतःला पुन्हा सिद्ध केले ‘बिग मॅच प्लेअर’, 7 सामने…

steve smith
Photo Courtesy: X

Steve Smith In WTC Final 2025: क्रिकेटची पंढरी मानल्या जाणाऱ्या लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप म्हणजे डब्ल्यूटीसी 2025 चा अंतिम सामना खेळला जात आहे. सामन्याच्या पहिल्या दिवशी नाणेफेक जिंकून दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. सुरुवातीचे फलंदाज लवकर बाद झाल्यानंतर अनुभवी स्टीव्ह स्मिथ याने पुन्हा एकदा शानदार खेळ करत संघाला सावरले.

Steve Smith In WTC Final 2025

प्रथम फलंदाजीचे आमंत्रण मिळाल्यावर ऑस्ट्रेलियाची सुरुवात अत्यंत खराब झाली. अनुभवी उस्मान ख्वाजा व कॅमेरून ग्रीन अनुक्रमे शून्य आणि चार धावा काढून बाद झाले. तर मार्नस लाबुशेन हा देखील फक्त 18 धावा करू शकला. एका बाजूने फलंदाज बाद होत असताना स्मिथ याने आपला दर्जा दाखवून दिला. ऐडन मार्करम याच्या चेंडूवर बाद होण्यापूर्वी त्याने 112 चेंडूंवर 66 धावांची खेळी केली होती. त्यामध्ये दहा चौकारांचा समावेश होता.

जगातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक असलेल्या स्मिथ याने ऑस्ट्रेलियासाठी दरवेळी मोठ्या व्यासपीठावर आपली उपयुक्तता सिद्ध केली आहे. त्याने 2015 वनडे विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व सामन्यात पाकिस्तान विरुद्ध 65, उपांत्य सामन्यात भारताविरुद्ध 105 व अंतिम सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध नाबाद 56 धावा केल्या होत्या. ऑस्ट्रेलियाचा इंग्लंडविरुद्ध पराभव झालेल्या 2019 वनडे विश्वचषक उपांत्य सामन्यात देखील त्याने 85 धावांची खेळी केली होती.

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023 च्या अंतिम सामन्यात स्मिथ याने 163 धावांची खेळी करत ऑस्ट्रेलियाला सामन्यात पुढे नेलेले. तर, 2025 चॅम्पियन ट्रॉफी उपांत्य सामन्यात भारताविरुद्ध पुन्हा एकदा 66 धावा केल्या होत्या. त्यानंतर आता तो पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियाच्या मदतीला धावला आहे.

Steve Smith In WTC Final 2025

WTC Final 2025 साठी ऑस्ट्रेलिया-दक्षिण आफ्रिकेने घोषित केल्या प्लेईंग 11, वाचा कोणाला मिळाली संधी

Exit mobile version