
Chelsea FC Won FIFA Club World Cup 2025: फिफा क्लब वर्ल्डकप 2025 ची सोमवारी सांगता झाली. चेल्सी विरूद्ध पीएसजी (Chelsea vs PSG) अशा झालेल्या अंतिम सामन्यात चेल्सीने 3-0 असा दणदणीत विजय मिळवून, क्लब वर्ल्डकप उंचावला. यासह सर्व महत्त्वाच्या स्पर्धा जिंकणारा चेल्सी एकमेव क्लब ठरला आहे.
Chelsea FC Won FIFA Club World Cup 2025
मेट लाइफ स्टेडियम येथे झालेल्या या सामन्यात पीएसजी विजयाचा प्रबळ दावेदार म्हणून मैदानात उतरला होता. मात्र, चेल्सीने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळाचा नजराना पेश केला. स्वतः कर्णधार कोल पाल्मर याने संघाच्या आक्रमणाचे नेतृत्व केले. त्याने 22 व्या मिनिटाला गोल करत आपल्या संघाला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर आठ मिनिटांनी पुन्हा एकदा 30 व्या मिनिटाला संघाची आघाडी वाढवली. पहिला हाफ संपण्यासाठी दोन मिनिटे शिल्लक असताना जाओ पेड्रो याने गोल करत संघाचा विजय जवळपास निश्चित केला.
दुसऱ्या सत्रात दोन्ही संघांनी गोल करण्याचे प्रयत्न केले. मात्र, कोणालाही यश मिळाले नाही. अखेर चेल्सी 3-0 अशा फरकाने विजय मिळवण्यात यशस्वी ठरला. पाल्मर हा सामन्याचा मानकरी ठरला. तसेच, स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू लागलेला जाणारा गोल्डन बॉल पुरस्कार देखील त्यालाच मिळाला. विजेत्या संघाला तब्बल 125 मिलियन डॉलर्स इतकी रक्कम मिळाली.
जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप
हे देखील वाचा: FIFA Club World Cup ची फायनल ठरली! Chelsea vs PSG रंगणार महामुकाबला
One comment
Pingback: Latest Sports News in Marathi । क्रीडा कॅफे ताज्या मराठी बातम्या । Cricket Live Score ।