Breaking News

Andre Russell चा धक्कादायक निर्णय! अचानक घेतली IPL मधून निवृत्ती, आता नवी भूमिका…

andre russell
Photo Courtesy: X

Andre Russell Announced Retirement From IPL: आयपीएल 2026 च्या लिलावापूर्वी वेस्ट इंडिजचा अष्टपैलू आंद्रे रसेल (Andre Russell) याने एक धक्कादायक निर्णय घेतला आहे. कोलकाता नाईट रायडर्स (KKR) ने त्याला करारमुक्त केल्यानंतर आता त्याने थेट आयपीएलमधून निवृत्तीची घोषणा केली. 

Andre Russell Announced Retirement From IPL

आंद्रे रसेल आयपीएल लिलावात सामील होणार असल्याने सर्व संघ त्यासाठी उत्सुक दिसत होते. मात्र, त्याने आपण लिलावात सहभागी होणार नसल्याचे जाहीर करत, आयपीएलमधून माघार घेतली. तो केकेआर संघासाठी आता पॉवर कोच म्हणून काम करेल.

रसेल याने दिल्ली डेअरडेविल्स संघासाठी आयपीएल कारकिर्दीची सुरुवात केली होती. मात्र, त्यानंतर 2014 पासून तो सातत्याने केकेआरसाठी खेळला. या दरम्यान केकेआरने 2014 व 2024 असे दोन वेळा आयपीएल विजेतेपद पटकावले. तो दोन वेळा स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरला. त्याने आपल्या कारकीर्दीत 140 सामने खेळले. यामध्ये 174 च्या स्ट्राइक रेटने 2651 धावा व 123 बळी मिळवले. रसेलने काही दिवसांपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून देखील निवृत्ती घेतली आहे.

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप

हे देखील वाचा: U19 Asia Cup 2025 साठी भारतीय संघ घोषित! मुंबईकर बनला कर्णधार

 

Exit mobile version