Apollo Tyres बनले टीम इंडियाचे नवे स्पॉन्सर! इतक्या कोटींमध्ये ठरला सौदा

apollo tyres
Photo Courtesy: X

Apollo Tyres Become Indian Cricket Team New Sponsor: भारतीय क्रिकेट संघाला नवा मुख्य प्रायोजक मिळाला आहे. अग्रगण्य टायर कंपनी असलेल्या अपोलो टायर्सने 2027 पर्यंत भारतीय संघाच्या मुख्य प्रायोजकाचे हक्क स्वतःकडे राखण्यात यश मिळवले. ते ड्रीम इलेव्हनची जागा घेतील.‌ विशेष म्हणजे ड्रीम इलेव्हनपेक्षा जास्त रकमेचा हा करार झालेला आहे.

Apollo Tyres Become Indian Cricket Team New Sponsor

भारत सरकारने बेटिंग ऍप व तत्सम कंपन्यांवर बंदी आणल्यानंतर ड्रीम इलेव्हनने भारतीय संघाचे प्रायोजकत्व सोडले होते. त्यानंतर भारतीय संघ विना प्रायोजक आशिया कप स्पर्धेत सहभागी होतोय. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने 1 सप्टेंबर रोजी नव्या मुख्य प्रायोजकासाठी निविदा मागवल्या होत्या. भारतीय संघाचे मुख्य आयोजक होण्यासाठी अनेक बड्या कंपन्यांनी रुची दाखवलेली. मात्र, अखेर अपोलो टायर्सने हक्क स्वतःकडे राखण्यात यशस्वी ठरले.

मिळत असलेल्या माहितीनुसार, अपोलो टायर्स भारतीय संघाच्या प्रत्येक सामन्यासाठी साडेचार कोटी रुपये देईल. यापूर्वी ड्रीम इलेव्हन प्रत्येक सामन्यासाठी देत होते. भारत 2027 च्या अखेरीपर्यंत 142 आंतरराष्ट्रीय सामने खेळणार आहे. यामध्ये भारताच्या महिला व पुरुष आंतरराष्ट्रीय संघांचा समावेश असेल. यापैकी 21 सामने हे आयसीसी स्पर्धांचे असतील.

अपोलो टायर्स यांना या बोलीसाठी जेके सिमेंट व कॅनवा यांच्यासोबत स्पर्धा करावी लागले. कॅनवाने 577 कोटी रुपयांची तर जेके सिमेंटने 477 रुपयांची बोली लावलेली. मात्र, अपोलो टायर्सने 579 रुपयांची बोली लावून हक्क आपल्याकडे राखले. आगामी महिला वनडे विश्वचषकापासून अपोलो टायर्स भारतीय जर्सीवर दिसू शकते.

यापूर्वी भारतासाठी विल्स, सहारा, स्टार, ओप्पो, बायजूस व ड्रीम इलेव्हन यांनी मुख्य प्रायोजक म्हणून भूमिका बजावली आहे. मात्र, दुर्दैवाने या सर्व कंपन्यांना दिवाळीखोरीला सामोरे जावे लागले.

Latest Sports News In Marathi

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप

हे देखील वाचा: कॅप्टन रजतचे पुन्हा सोनेरी यश! Duleep Trophy 2025 मध्य विभागाच्या नावे

Exit mobile version