Breaking News

देशभरातील 32 मातब्बर खेळाडू Arjuna Award 2024 ने सन्मानित, महाराष्ट्रातील दोघेच, पाहा संपूर्ण यादी

arjuna award 2024
Photo Courtesy: X

Arjuna Award 2024: भारत सरकार आणि क्रीडा मंत्रालयातर्फे दरवर्षी देण्यात येणारे क्रीडा पुरस्कार जाहीर झाले आहेत. यावेळी चार खेळाडूंना मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार तर तब्बल 32 खेळाडूंना अर्जुन पुरस्काराने सन्मानित केले गेले. महाराष्ट्राचा ऑलिम्पिक कांस्यपदक विजेता नेमबाज स्वप्निल कुसळे (Swapnil Kusale) व पॅराऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता गोळाफेकपटू सचिन खिलारी (Sachin Khilari) यांना या यादीत स्थान मिळाले.

Arjuna Award 2024 Announced

गुरुवारी (2 जानेवारी) जाहीर झालेल्या या पुरस्कारांमध्ये विविध खेळातील 32 खेळाडू समाविष्ट आहेत. यापैकी 17 खेळाडू पॅरा ऍथलिट आहेत. पॅरिस ऑलिम्पिक व पॅराऑलिम्पिक स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या बहुतांशी खेळाडूंची यामध्ये वर्णी लागली. या खेळाडूंना 17 जानेवारी रोजी राष्ट्रपती भवन येथे सन्मानित केले जाईल.

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप

अर्जुन पुरस्कार प्राप्त खेळाडू:

स्वप्निल कुसळे व सरबजोत सिंग (नेमबाजी), ज्योती याराजी (ऍथलेटिक्स), अन्नू राणी (भालाफेक), नितू व स्वीटी (बॉक्सिंग), वंतिका अगरवाल (बुद्धिबळ), सलिमा टेटे, अभिषेक, जरमनप्रीत सिंग व सुखजीत सिंग (हॉकी), अमन (कुस्ती), साजन प्रकाश (जलतरण), अभय सिंग (स्क्वॅश), सचिन खिलारी, प्रीती पाल, दिप्ती जीवांजी, (पॅरा ऍथलिट), अजित सिंग, धरमबीर, प्रणव सूरमा, होकाटो सेमा, नवदीप व सिमरन (सर्व पॅरा ऍथलिट), नितेश कुमार, टी. मुरूगसेन, नित्या सिवान व मनिषा रामदास (सर्व पॅरा बॅडमिंटन), मोना अगरवाल व रूबिना फ्रान्सिस (पॅरा नेमबाजी) व कपिल परमार (पॅरा जुडो)

(Arjuna Award 2024 Announced)

हे देखील वाचा- अखेर Khel Ratna Award 2024 चा तिढा सुटला! ‘या’ चौघांना मिळणार देशातील सर्वोच्च क्रीडा पुरस्कार

Exit mobile version