Breaking News

2025 च्या सुरुवातीलाच कॅप्टन्सीसाठी Indian Cricket Team मध्ये राडा? कोण आहे Mr. Fix It? सिनियर्स विरूद्ध ज्युनियर्स वाद…

INDIAN CRICKET TEAM
Photo Courtesy: X

Rift In Indian Cricket Team: भारतीय क्रिकेट संघाचा (Indian Cricket Team) ऑस्ट्रेलिया दौरा संपण्यासाठी आता अवघे काही दिवस शिल्लक आहेत. पाच सामन्यांच्या मालिकेतील अखेरचा सामना शुक्रवारी (3 जानेवारी) सिडनी (Sydney Test) येथे सुरू होईल. तत्पूर्वी, भारतीय संघात सर्वकाही आलबेल नसल्याचे चित्र दिसत आहे.

Rift In Indian Cricket Team

पाचव्या कसोटीआधी भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याने माघार घेतल्याचे समजते. तर, पत्रकार परिषदेत बोलताना भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर (Head Coach Gautam Gambhir) यांनी भारताच्या प्लेईंग 11 चा निर्णय अखेरच्या क्षणी खेळपट्टी पाहून घेऊ, असे म्हटल्याने चर्चेला उधाण आले होते. त्यात आता वरिष्ठ क्रीडा पत्रकार देवेंद्र पांडे यांनी एका आघाडीच्या वृत्तपत्रासाठी केलेल्या रिपोर्टनंतर भारतीय संघात मोठी दरी निर्माण झाल्याचे सुचवले आहे.

या रिपोर्टनुसार, रोहित शर्मा याची कसोटी कारकीर्द जवळपास समाप्त झाल्याचे संघ व्यवस्थापन व खेळाडूंनी गृहीत धरण्याचे दिसते. त्यामुळे आगामी कर्णधारपदासाठी भारतीय संघात जोरदार रस्सीखेच सुरू असल्याचे सांगितले जातेय. ‘मि. फिक्स ईट’ (Mr Fix It) म्हणून एक अनुभवी खेळाडू दुसऱ्या कसोटीनंतरच अंतरिम कर्णधारपद मिळवण्यासाठी उत्सुक होता. सर्व गोष्टी ठीक झाल्यानंतर तो आपले पद सोडण्यासाठी देखील तयार असल्याचे सांगितले गेले.

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप

यासोबतच ऑस्ट्रेलियात पोहोचल्यानंतर दोन युवा खेळाडूंनी आपल्याला कर्णधारपदात रस असल्याचे संघ व्यवस्थापनातील काही सदस्यांना म्हटल्याचे समजते. ऑस्ट्रेलियात काहीतरी चांगली कामगिरी करून दाखवण्याचा त्यांचा मानस होता. या संपूर्ण प्रकरणात कोणत्याही खेळाडूचे नाव समोर आले नसले तरी, अनेकांनी आपल्या परीने अंदाज वर्तवणे सुरू केले आहे.

रोहित शर्मा अखेरचा कसोटी सामना खेळणार नसल्याने व त्यानंतर भारतीय संघ जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात न पोहोचल्यास रोहित आपली कसोटी निवृत्ती जाहीर करू शकतो. सध्या तरी आगामी कसोटी कर्णधार म्हणून वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह हाच पहिली पसंती असल्याचे स्पष्ट संकेत बोर्ड, निवड समिती व संघ व्यवस्थापनाकडून देण्यात आले आहेत.

(There Is Rift In Indian Cricket Team)

हे देखील वाचा- Rohit Sharma ची कसोटी कारकीर्द समाप्त? कोच गंभीरचे सूचक वक्तव्य, म्हणाला..

धक्कादायक! सिडनी कसोटीतून Rohit Sharma ची माघार! दोन बदलांसह अशी असणार प्लेईंग 11

Exit mobile version