Breaking News

धक्कादायक! सिडनी कसोटीतून Rohit Sharma ची माघार! दोन बदलांसह अशी असणार प्लेईंग 11

ROHIT SHARMA
Photo Courtesy: X

Rohit Sharma Opt Out: शुक्रवारी (3 जानेवारी) सुरू होणाऱ्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत (AUS v IND) यांच्यातील पाचव्या कसोटीआधी मोठी बातमी समोर येत आहे. सिडनी (Sydney Test) येथे होणाऱ्या या कसोटीतून भारतीय कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याने माघार घेतल्याचे समजते. याबाबत त्याने संघ व्यवस्थापनाला कळवल्याचे वृत्त आहे.

Rohit Sharma Has Opted Out From Sydney Test

एका वृत्तपत्राच्या बातम्यानुसार, रोहित याने मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर व मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांना आपण अखेरच्या कसोटीसाठी उपलब्ध नसल्याचे कळवले आहे. याबाबत अधिकृत घोषणा लवकरच होऊ शकते. गुरुवारी गंभीर यांनी केलेल्या पत्रकार परिषदेनंतर, रोहित याला वगळण्यात येणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर रोहितने हा निर्णय घेतल्याचे समजते.

रोहित हा उपलब्ध नसल्याने शुबमन गिल हा संघात पुनरागमन करेल. त्यामुळे यशस्वी जयस्वाल व केएल राहुल हे सलामीवीर म्हणून पुन्हा एकदा भूमिका बजावतील. तर, गिल तिसऱ्या क्रमांकावर खेळेल. फलंदाजी क्रमवारीत इतर बदल होण्याची शक्यता अगदीच कमी आहे.

वेगवान गोलंदाज आकाश दीप हा यापूर्वीच दुखापतग्रस्त झाल्याने अखेरच्या कसोटीतून बाहेर पडला आहे. त्याच्याजागी प्रसिद्ध कृष्णा याला संधी देण्यात येईल. तो जसप्रीत बुमराह व मोहम्मद सिराज यांच्यासह वेगवान गोलंदाजीचा भार वाहताना दिसेल.

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप

सिडनी कसोटीसाठी भारताची संभाव्य प्लेईंग 11- जसप्रीत बुमराह (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, शुबमन गिल, विराट कोहली, रिषभ पंत, नितिशकुमार रेड्डी, रविंद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, मोहम्मद सिराज व प्रसिद्ध कृष्णा.

(Rohit Sharma Has Opted Out From Sydney Test)

हे देखील वाचा- Rohit Sharma ची कसोटी कारकीर्द समाप्त? कोच गंभीरचे सूचक वक्तव्य, म्हणाला..

Exit mobile version