Breaking News

Kylian Mbappe: फुटबॉलविश्वात भूकंप! जगप्रसिद्ध फुटबॉलरवर बला’त्काराचा आरोप, स्वीडनमध्ये गुन्हा दाखल

Real Madrid Sign Kylian Mbappe
Photo Courtesy: X

Kylian Mbappe: संपूर्ण फुटबॉल तसेच क्रीडा जगताला हादरवणारी बातमी स्वीडनमधून समोर येत आहे. फ्रान्सचा दिग्गज फुटबॉलपटू किलीयन एम्बाप्पे (Kylian Mbappe) याच्यावर एका महिलेने बला’त्काराचा आरोप केला असून, पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. एम्बाप्पे याने या आरोपांचे खंडन केले असून, आपण निर्दोष असल्याचे म्हटले.

स्वीडनमधील एका वृत्तपत्राने दिलेल्या बातमीनुसार, एम्बाप्पे सध्या विश्रांती घेत आहे. यादरम्यान तो स्टॉकहोम येथे फिरण्यासाठी आलेला. तेथे जेवण केल्यानंतर त्याने एका महिलेवर बला’त्कार केल्याचे या वृत्तपत्राने म्हटले. तसेच, या महिलेने पोलिसांत फिर्याद दिली असल्याचे देखील सांगण्यात आले.

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप

एम्बाप्पे हा फ्रान्स आणि रियाल मद्रिदचा स्ट्रायकर म्हणून प्रसिद्ध आहे. याच हंगामात त्याने रियाल मद्रिदसोबत विक्रमी करार केलेला. त्याने सध्या नेशन्स कपमधून माघार घेतली असून, तो विश्रांती घेत आहे. ज्या वृत्तपत्राने त्याच्यावर हे आरोप केले आहेत, त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करणार असल्याचे एम्बाप्पे याने म्हटले.

(Kylian Mbappe Investigate On Rape Case In Sweden)

Exit mobile version