Breaking News

भारतीय क्रिकेटमध्ये वादळ! Gautam Gambhir चा युवा खेळाडूवर सनसनाटी आरोप ?

gautam gambhir
Photo Courtesy: X

Gautam Gambhir On Dressing Room Talk: सध्या भारतीय क्रिकेट संघातील (Indian Cricket Team) परिस्थिती आलबेल नाही. ऑस्ट्रेलिया दौऱ्यापासून भारतीय संघात दोन गट तयार झाल्याची चर्चा आहे. तसेच, कर्णधारपदावरून काही खेळाडूंमध्ये रस्सीखेच सुरू असल्याचे सांगितले जाते. असे असतानाच, आता भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर (Gautam Gambhir) यांच्याविषयी एक महत्त्वाचे बातमी समोर येत आहे.

Gautam Gambhir On Dressing Room Leaks

शनिवारी भारतीय क्रिकेट संघाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याची आढावा बैठक आयोजित केली होती. मुंबई येथे झालेल्या बैठकीत बीसीसीआयचे काही अधिकारी मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर, कर्णधार रोहित शर्मा व निवड समिती अध्यक्ष अजित आगरकर हे हजर होते. या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय झाल्याचे सांगण्यात येते. त्याचबरोबर गंभीर यांनी भारतीय संघाबाबत एक मोठा गौप्यस्फोट केल्याचे वृत्त आहे.

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप

माध्यमातील वृत्तानुसार, गौतम गंभीर यांनी भारतीय ड्रेसिंग रूममधील बातम्या पत्रकारांना देण्याचा आरोप युवा फलंदाज सर्फराज खान (Sarfaraz Khan) याच्यावर केला आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असताना टीम मीटिंगमधील ज्या काही महत्त्वाच्या बातम्या होत्या, त्या लगेच माध्यमांमध्ये पोहोचत असत. या बातम्या सर्फराज माध्यमांना पुरवत असल्याची तक्रार गंभीरने पदाधिकाऱ्यांना केली आहे. याबाबत अद्याप कोणतेही अधिकृत विधान बीसीसीआयकडून आलेले नाही.

ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर रोहित शर्मा याला वगळणार असल्याची चर्चा जोरात सुरू होती. त्यानंतर रोहित याने आपण अखेरच्या कसोटीतून माघार घेत असल्याचे सांगितले होते. याव्यतिरिक्त प्लेईंग 11 बद्दलची तरीच माहिती आधीच माध्यमांमध्ये येत होती.

(Gautam Gambhir On Dressing Room Leaks)

हे देखील वाचा- Champions Trophy 2025 साठी न्यूझीलंड संघ जाहीर! दिग्गजांना डच्चू, तरूणांना संधी

Champions Trophy 2025 साठी अफगाणिस्तानची मजबूत दावेदारी, शाहिदीच्या नेतृत्वातील संघ घोषित

 

Exit mobile version