Breaking News

Champions Trophy 2025 साठी टीम इंडियाची घोषणा, रोहितच्या नेतृत्वात हे 15 शिलेदार सज्ज

champions trophy 2025
Photo Courtesy: X

India Squad For Champions Trophy 2025: दुबई आणि पाकिस्तान येथे होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 (Champions Trophy 2025) स्पर्धेसाठी व इंग्लंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी भारतीय क्रिकेट संघाची घोषणा करण्यात आली आहे (India Squad For Champions Trophy 2025). रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्या नेतृत्वात भारत या स्पर्धेत उतरेल. भारताने अखेरच्या वेळी 2013 मध्ये ही स्पर्धा जिंकली होती.

India Squad For Champions Trophy 2025

घोषित केलेल्या संघाचे नेतृत्व रोहित शर्मा करेल. युवा शुबमन गिल याच्यावरील विश्वास कायम ठेवत त्याला उपकर्णधार बनवण्यात आले आहे. विराट कोहली, केएल राहुल व श्रेयस अय्यर दिसतील. यशस्वी जयस्वाल याला प्रथमच भारताच्या वनडे संघात स्थान मिळाले असून, तो वनडे पदार्पण देखील करू शकतो. रिषभ पंत हा देखील मोठ्या कालावधीनंतर वनडे संघात स्थान मिळवण्यात यशस्वी ठरला. एकमेव मध्यमगती गोलंदाजी अष्टपैलू म्हणून हार्दिक पंड्या संघात असेल. या संघात चार फिरकी गोलंदाजांचा समाविष्ट असून, वॉशिंग्टन सुंदर याला कुलदीप यादव, अक्षर पटेल व रविंद्र जडेजा यांच्यासह फिरकीची जबाबदारी पाडावी लागेल.

वेगवान गोलंदाजीची धुरा जसप्रीत बुमराह, तब्बल 14 महिन्यानंतर पुनरागमन करत असलेला मोहम्मद शमी व डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग यांच्या खांद्यावर असेल. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी बुमराहच्या जागी हर्षित राणा हा संघाचा भाग असेल.

पाकिस्तान या स्पर्धेचे यजमानपद भूषवणार होता. मात्र, भारतीय संघाने पाकिस्तानात जाण्याचे नाकारल्यानंतर हायब्रीड मॉडेलनुसार भारताचे सर्वसामान्य दुबई येथे खेळले जातील. भारताच्या गटात यजमान पाकिस्तान, न्युझीलंड व बांगलादेश यांचा समावेश आहे. इंग्लंड येथे 2017 मध्ये झालेल्या अखेरच्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत पाकिस्तानने भारताचा पराभव करत ही स्पर्धा जिंकली होती.

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी भारतीय संघ: रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, रिषभ पंत, श्रेयस अय्यर, हार्दिक पंड्या, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, शुबमन गिल (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, अक्षर पटेल, केएल राहुल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, रविंद्र जडेजा

(India Squad For Champions Trophy 2025)

हे देखील वाचा- Champions Trophy 2025 साठी न्यूझीलंड संघ जाहीर! दिग्गजांना डच्चू, तरूणांना संधी

Champions Trophy 2025 साठी अफगाणिस्तानची मजबूत दावेदारी, शाहिदीच्या नेतृत्वातील संघ घोषित

जगज्जेत्या ऑस्ट्रेलियाने Champions Trophy 2025 साठी निवडला संघ, कमिन्सच कॅप्टन मात्र शिलेदार बदलले

Exit mobile version