Breaking News

जगज्जेत्या ऑस्ट्रेलियाने Champions Trophy 2025 साठी निवडला संघ, कमिन्सच कॅप्टन मात्र शिलेदार बदलले

Champions Trophy 2025
Photo Courtesy: X

Australia Squad For Champions Trophy 2025: आगामी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 (Champions Trophy 2025) स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलियाने आपल्या संघाची घोषणा केली आहे. जाहीर केलेल्या 15 सदस्यीय संघाचे नेतृत्व विश्वविजेता कर्णधार पॅट कमिन्स (Pat Cummins) करेल. कमिन्स याच्याच नेतृत्वात ऑस्ट्रेलियाने 2023 वनडे विश्वचषक (2023 ODI World Cup) जिंकला होता.

Australia Squad For Champions Trophy 2025

क्रिकेट ऑस्ट्रेलियाने जाहीर केलेल्या संघात विश्वचषक संघातील 12 खेळाडूंचा समावेश आहे. डेव्हिड वॉर्नर याच्या निवृत्तीनंतर त्याच्या जागी मॅथ्यू शॉर्ट याला सलामीवीर म्हणून संघात स्थान मिळाले. तर, दुखापतग्रस्त अष्टपैलू कॅमेरून ग्रीन याच्या जागी ऍरन हार्डी याला संधी देण्यात आली आहे. विश्वचषक संघातील सीन एबॉट या संघात जागा बनवण्यात अपयशी ठरला. त्याच्या जागी नॅथन एलिस खेळताना दिसेल.

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप

ऑस्ट्रेलियाच्या वेगवान गोलंदाजीचे धुरा कमिन्ससह अनुभवी मिचेल स्टार्क व जोश हेजलवूड सांभाळतील. दोघेही दुखापतीतून पुनरागमन करत आहेत. फिरकीची धुरा पुन्हा एकदा ऍडम झम्पा याच्या खांद्यावर असेल. तर, अष्टपैलू म्हणून मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल व मार्कस स्टॉयनिस हे पुन्हा एकदा संघात दिसणार आहेत. फलंदाजीत ट्रेविस हेड, मार्नस लॅब्युशेन व स्टीव्ह स्मिथ यांच्या जोडीला ऍलेक्स केरी आणि जोश इंग्लिश हे यष्टीरक्षक असतील.

विश्वविजेता असलेल्या ऑस्ट्रेलिया संघाला 2009 नंतर चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकता आलेली नाही. 2013 व 2017 चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत त्यांना प्रवेश करता आला नव्हता. त्यामुळे आता 16 वर्षांचा वनवास संपवण्याचे त्यांचे लक्ष असेल. ऑस्ट्रेलियाने 2006 व 2009 अशी सलग दोनदा ही स्पर्धा जिंकली होती.

चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी ऑस्ट्रेलिया संघ: पॅट कमिन्स (कर्णधार), स्टीव्ह स्मिथ, ट्रेविस हेड, मार्नस लॅब्युशेन, ऍलेक्स केरी, जोश इंग्लिश, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉयनिस, ऍरन हार्डी, मॅथ्यू शॉर्ट, मिचेल स्टार्क, जोश हेजलवूड, नॅथन एलिस व ऍडम झम्पा.

(Australia Squad For Champions Trophy 2025)

हे देखील वाचा- Champions Trophy 2025 साठी न्यूझीलंड संघ जाहीर! दिग्गजांना डच्चू, तरूणांना संधी

Champions Trophy 2025 साठी अफगाणिस्तानची मजबूत दावेदारी, शाहिदीच्या नेतृत्वातील संघ घोषित

Exit mobile version