Breaking News

आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ संपवण्यासाठी दक्षिण आफ्रिका सज्ज, Champions Trophy 2025 साठी संघ घोषित

champions trophy 2025
Photo Courtesy: x

South Africa Squad For Champions Trophy 2025 : पाकिस्तान व दुबई येथे होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 (Champions Trophy 2025) स्पर्धेसाठी दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघ (South Africa Cricket Team) जाहीर करण्यात आला आहे. सलामीवीर टेंबा बवुमा (Temba Bavuma) या संघाचे नेतृत्व करेल. दक्षिण आफ्रिकेने 1998 नंतर कोणतीही आयसीसी स्पर्धा जिंकलेली नाही.

South Africa Squad For Champions Trophy 2025

दक्षिण आफ्रिका संघ 2023 वनडे विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत तर टी20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचला होता. त्यानंतर आता त्यांनी जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यातील आपली जागा पक्की केली आहे. असे असताना, चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्याचा त्यांचा मनोदय असेल.

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप

चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी दक्षिण आफ्रिका संघ- टेंबा बवुमा (कर्णधार), टोनी डी झोर्झी, कगिसो रबाडा, लुंगी एन्गिडी, तबरेझ शम्सी, केशव महाराज, विहान मुल्डर, मार्को जेन्सन, रासी वॅन डर डसेन, रायन रिकलटन, डेव्हिड मिलर, एन्रिक नॉर्किए, ट्रिस्टन स्टब्स, ऐडन मार्करम व हेन्रिक क्लासेन.

(South Africa Squad For Champions Trophy 2025)

हे देखील वाचा- Champions Trophy 2025 साठी न्यूझीलंड संघ जाहीर! दिग्गजांना डच्चू, तरूणांना संधी

Champions Trophy 2025 साठी अफगाणिस्तानची मजबूत दावेदारी, शाहिदीच्या नेतृत्वातील संघ घोषित

जगज्जेत्या ऑस्ट्रेलियाने Champions Trophy 2025 साठी निवडला संघ, कमिन्सच कॅप्टन मात्र शिलेदार बदलले

Exit mobile version