Breaking News

IPL 2025 Auction: पहिल्याच सेटमध्ये तुटले लिलावाचे सारे रेकॉर्ड, सहाही जणांवर बरसला पैसा, पाहा यादी

IPL 2025 AUCTION
Photo Courtesy: X

IPL 2025 Auction: आयपीएल 2025 (IPL 2025) साठी होत असलेल्या आयपीएल लिलावाच्या पहिल्याच सेटमध्ये पैशांचा अक्षरशः पाऊस पडला. केवळ सहा खेळाडू असलेल्या या सेटमध्ये प्रत्येकाने मोठी किंमत मिळवली. रिषभ पंत (Rishabh Pant) याच्यावर तब्बल 27 कोटींची बोली लावत लखनऊ सुपरजायंट्सने त्याला आपल्या ताफ्यात दाखल करून घेतले. तो आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला.

पहिल्या सेटमध्ये बोली लागलेले खेळाडू:

अर्शदीप सिंग (पंजाब किंग्स)- 18 कोटी

कगिसो रबाडा (गुजरात टायटन्स)- 10.75 कोटी

श्रेयस अय्यर (पंजाब किंग्स)- 26.75 कोटी

जोस बटलर (गुजरात टायटन्स)- 15.75 कोटी

मिचेल स्टार्क (दिल्ली कॅपिटल्स)- 11.75 कोटी

रिषभ पंत (लखनऊ सुपरजायंट्स)- 27 कोटी

(IPL 2025 Auction First Set 1)

IPL 2025 Auction: राहुलसह सिराज, शमी अन् चहल मालामाल! मिळाले नवे संघ, जाणून घ्या किंमत

Exit mobile version