Breaking News

Champions Trophy 2025 आधी ऑस्ट्रेलियाला जबर धक्का! पाच दिग्गज खेळाडूंची माघार, कॅप्टनही बदलला

champions trophy 2025
Photo Courtesy: X

Five Changes In Australia Squad For Champions Trophy 2025: चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 (Champions Trophy 2025) आधी ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाला मोठा हादरा बसला आहे. संघ बदलाच्या अखेरच्या दिवशी ऑस्ट्रेलियन संघात पाच बदल करण्यात आले. नियमित कर्णधार पॅट कमिन्स (Pat Cummins) याच्यासह पाच खेळाडू या स्पर्धेसाठी उपलब्ध नसतील. त्यामुळे एका नव्या संघाचे स्टीव्ह स्मिथ (Steve Smith) या स्पर्धेत नेतृत्व करेल.

Five Changes In Australia Squad For Champions Trophy 2025

ऑस्ट्रेलियन संघाचा कर्णधार पॅट कमिन्स, प्रमुख वेगवान गोलंदाज जोश हेजलवूड व अष्टपैलू मिचेल मार्श हे दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडले आहेत. अनुभवी वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क याने वैयक्तिक कारणाने स्पर्धेतून माघारी घेतली. तर, मार्कस स्टॉयनिस याने अचानक निवृत्तीची घोषणा केली होती. तसेच यापूर्वी युवा अष्टपैलू कॅमेरून ग्रीन हा आधीच दुखापतग्रस्त असल्याने संघात समाविष्ट नव्हता. विशेष म्हणजे हे सर्व खेळाडू 2023 विश्वचषक विजेच्या संघाचा भाग होते.

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप

बदललेल्या संघात युवा सलामीवीर जॅक फ्रेझर-मॅकगर्क, बेन द्वारशीस, स्पेन्सर जॉन्सन, सीन एबॉट व तन्वीर सांघा यांचा समावेश केला गेला आहे. ऑस्ट्रेलिया या स्पर्धेत ब गटामध्ये अफगाणिस्तान, इंग्लंड व दक्षिण आफ्रिकेशी लढेल. विशेष म्हणजे मागील बारा वर्षांपासून ऑस्ट्रेलियाने या स्पर्धेत एकही सामना जिंकलेला नाही.

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी ऑस्ट्रेलिया संघ: स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), ट्रेविस हेड, मार्नस लॅब्युशेन, ऍलेक्स केरी, ग्लेन मॅक्सवेल, जोश इंग्लिश, नॅथन एलिस, ऍडम झम्पा, ऍरॉन हार्डी, मॅट शॉर्ट, जॅक फ्रेझर-मॅकगर्क, बेन द्वारशीस, स्पेन्सर जॉन्सन, सीन एबॉट, तन्वीर सांघा.

Five Changes In Australia Squad For Champions Trophy 2025

अखेर बुमराहविनाच टीम इंडिया खेळणार Champions Trophy 2025, संघात दोन महत्त्वाचे बदल

Exit mobile version