
Sanju Samson Trade For IPL 2026: राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) संघाचा कर्णधार संजू सॅमसन (Sanju Samson) हा सध्या चांगलाच चर्चेत आहे. आयपीएल 2026 साठी त्याला आपल्या संघात घेण्याकरता दोन संघ इच्छुक असल्याचे समजते. आता राजस्थान रॉयल संघ व्यवस्थापन व स्वतः संजू काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे.
A SENIOR CSK OFFICIAL ON SANJU SAMSON. [Cricbuzz]
"We are definitely looking at Sanju Samson. He is an indian Batter, who is a keeper & opener. So if he is available, we will certainly have a look at the option of having him in our fold. Who we will trade him with we have not… pic.twitter.com/osKSbmGkIE
— Tanuj (@Tanujkaswan) July 1, 2025
CSK Intrested In Sanju Samson Trade
आयपीएल 2025 मध्ये संजू दुखापतीमुळे बरेच सामने खेळू शकला नव्हता. तसेच, संजू व संघ व्यवस्थापन यांच्या दरम्यान सर्वकाही ठीक नसल्याचे बोलले जात होते. त्यामुळे काही दिवसांपासून संजू हा रॉयल्स संघापासून बाजूला होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. चेन्नई सुपर किंग्स व कोलकाता नाईट रायडर्स हे संजूला आपल्या संघात घेण्यासाठी सर्वाधिक इच्छुक असल्याचे समजते. (Latest Cricket News)
चेन्नईच्या एका मोठ्या पदाधिकाऱ्याने तर थेट संजू ट्रेडसाठी उपलब्ध असला तर, त्याला संघात घेण्यासाठी सी एस के तयार असल्याचे बोलले. तर, कोलकाता देखील नवा कर्णधार व भारतीय यष्टीरक्षक म्हणून संजूकडे पर्याय म्हणून पाहतेय. मात्र, राजस्थान रॉयल्स 18 कोटींमध्ये रिटेन केलेल्या तसेच मागच्या पाच वर्षांपासून नेतृत्व करत असलेल्या संजूला रिलीज करणार का, हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा असेल.
जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप
हे देखील वाचा: डॉक्टर्स डे स्पेशल: कोण आहेत Dr Dinshaw Pardiwala ? ज्यांच्यावर आहे प्रत्येक भारतीय खेळाडूचा 100% विश्वास
Chinnaswamy Stadium Stampede बाबत कोर्टाचा मोठा निर्णय, 11 जणांच्या मृत्यूला यांना धरले जबाबदार