Breaking News

विश्वविजेत्या Indian Womens Cricket Team ला घसघशीत बोनस! BCCI ने मनमोकळेपणे खोलली तिजोरी

indian womens cricket team
Photo Courtesy: X

BCCI Give Bonus To Indian Womens Cricket Team: रविवारी (2 नोव्हेंबर) भारतीय महिला क्रिकेट संघाने दक्षिण आफ्रिकेला हरवत आयसीसी महिला वनडे क्रिकेट विश्वचषक (ICC Womens Cricket World Cup 2025) जिंकला. भारताने 52 वर्षाच्या इतिहासात प्रथमच या विश्वचषकाला गवसणी घातली. त्यानंतर सर्वत्र संघाचे कौतुक होत आहे. आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने संघाचे कौतुक करताना, मोठा बोनस जाहीर केला.

BCCI Give Bonus To Indian Womens Cricket Team

नवी मुंबई येथील डी.वाय पाटील स्टेडियम येथे झालेल्या अंतिम सामन्यात भारताने 52 धावांनी विजय मिळवला. त्यानंतर सर्वत्र जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळाले. बीसीसीआयने यानंतर भारतीय खेळाडू व सपोर्ट स्टाफ यांच्यासाठी तब्बल 51 कोटींच्या बोनसची घोषणा केली. बीसीसीआय सेक्रेटरी देवजित सायकिया यांनी माहिती देताना म्हटले, “हा आपल्या सर्वांसाठी अभिमानाचा क्षण आहे. आपण या संघासाठी 51 कोटी रुपयांचा बोनस जाहीर करत आहोत. खेळाडू, प्रशिक्षक, सपोर्ट स्टाफ आणि निवडकर्ते यांच्यामध्ये हा बोनस वाटला जाईल.”

विश्वविजेता बनल्यानंतर भारतीय संघाला जवळपास 42 कोटी रुपये मिळणार आहे. विशेष म्हणजे ‌2022 मध्ये विश्वचषक जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलियापेक्षा ही रक्कम चारपट आहे.

Latest Sports News In Marathi

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप

हे देखील वाचा: पोरींनी जग जिंकले! भारत बनला ICC Womens Cricket World Cup 2025 चा विश्वविजेता

 

Exit mobile version