Breaking News

Wimbledon 2025: विजेतेपदाच्या हॅट्रिकसाठी Carlos Alcaraz फायनलमध्ये! फ्रित्झची झुंज अपयशी

wimbledon 2025
Photo Courtesy: X

Carlos Alcaraz In Wimbledon 2025 Final: विम्बल्डन 2025 च्या पुरुष एकेरीचा पहिला उपांत्य सामना पार पडला. सेंटर कोर्टवर झालेल्या या सामन्यात दुसऱ्या मानांकित कार्लोस अल्कारेझ याने पाचव्या मानांकित टेलर फ्रित्झ (Taylor Fritz) याला चार सेटपर्यंत रंगलेल्या सामन्यात मात दिली. यासह अल्कारेझ सलग तिसऱ्या वर्षी विम्बल्डनच्या अंतिम सामन्यात पोहोचला.

Carlos Alcaraz Entered In Wimbledon 2025 Final

विजेतेपदाचा दावेदार असलेला अल्कारेझ सामन्याच्या पहिल्याच सेटमध्ये आघाडी घेण्यात यशस्वी ठरला. पहिला सेट 6-4 असा त्याने नावावर केला. दुसऱ्या सेटमध्ये फ्रित्झ याने पुनरागमन करत 7-5 असा विजय मिळवला. तिसरा सेट अल्कारेझने 6-3 असा पुन्हा एकदा जिंकून आघाडी मिळवली. चौथ्या सेटमध्ये टायब्रेकरमध्ये दोन्ही खेळाडू झुंजताना दिसले. अखेरीस अल्कारेझने 7-6 असा विजय संपादन केला. अल्कारेझ याच्याकडे सलग तिसऱ्या वर्षी ही मानाची स्पर्धा जिंकण्याची संधी असेल.

दुसऱ्या उपांत्य सामन्यात अव्वल मानांकित जानिक सिन्नर व अनुभवी नोव्हाक जोकोविच हे भिडतील. जोकोविच आपल्या 25 व्या ग्रँडस्लॅमच्या शोधात आहे.

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप 

हे देखील वाचा- Tennis Player Radhika Yadav ची वडिलांनीच केली ह’त्या, धक्कादायक कारण उघड

Exit mobile version