Danni Wyatt Wedding :- भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली (Virat Kohli) याचा चाहतावर्ग मोठा आहे. त्याच्या धडाकेबाज फलंदाजी आणि चपळ क्षेत्ररक्षणाबरोबरच त्याच्या लूक आणि फिटनेसवर मरणाऱ्या महिला चाहत्यांची संख्या मोठी आहे. बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा हिच्यासोबत लग्न होण्यापूर्वी विराटला महिला चाहत्यांचे भरपूर प्रपोजल आले होते. इंग्लंडची महिला क्रिकेटपटू डॅनियल वॅट (Danielle Wyatt) हिनेही विराटला लग्नाची मागणी घातली होती. आता हिच डॅनियल वॅट तिच्या दीर्घकालीन प्रेयसीसोबत विवाहबंधनात अडकली आहे.
इंग्लंडची सलामीवीर डॅनियल वॅटने तिची प्रेयसी जॉर्जी हॉजसोबत सोमवारी (11 जून) लग्न केले आहे. डॅनियलने तिच्या सोशल मीडिया अकाउंट इन्स्टाग्रामवर लग्नाचे फोटो शेअर केले आहेत. डॅनियल आणि जॉर्जी हॉज बराच काळ रिलेशनशिपमध्ये होत्या. दोघींनी गेल्या वर्षी साखरपुडा केला होता. डॅनियल वॅट ही क्रिकेटपटू आहे, तर जॉर्जी हॉज फुटबॉल संघाची व्यवस्थापक आहे. आता चाहते या दोघींना लग्नासाठी शुभेच्छा देत आहेत.
विराट कोहलीला प्रपोज केले होते
2014 मध्ये विराट कोहलीला प्रपोज केल्यामुळे डॅनियल वॅट चर्चेत होती. डॅनियलने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरुन प्रपोज करताना लिहिले होते की, “कोहली, माझ्याशी लग्न कर.” तिची ही पोस्ट चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरली होती. यानंतर तिने आपल्या पोस्टवर स्पष्टीकरण देत आपण हे केवळ विनोद म्हणून केल्याचे सांगितले होते.
महत्वाच्या बातम्या-
T20 World Cup| बांगलादेशविरूद्व केशव ठरला ‘महाराज’, शेवटच्या चेंडूवर विजय मिळवत आफ्रिका सुपर 8 मध्ये
I have been examinating out some of your posts and i must say pretty good stuff. I will surely bookmark your website.
Do you mind if I quote a couple of your posts as long as I provide credit and sources back to your weblog? My blog site is in the exact same area of interest as yours and my visitors would definitely benefit from some of the information you provide here. Please let me know if this alright with you. Thanks!