Breaking News

Lords Test साठी इंग्लंडने जाहीर केली प्लेईंग इलेव्हन! तब्बल 1596 दिवसानंतर कसोटी संघात दिसणार हा दिग्गज

lords test
Photo Courtesy: X

England Playing XI For Lords Test: इंग्लंड आणि भारत (ENG vs IND) यांच्या दरम्यान पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील तिसरा सामना 10 जुलैपासून क्रिकेटची पंढरी मानल्या जाणाऱ्या लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर (Lords Cricket Ground) खेळला जाईल. या सामन्याच्या एक दिवस आधीच इंग्लंडने आपली प्लेईंग इलेव्हन (England Playing XI) जाहीर केली आहे.

England Playing XI For Lords Test

इंग्लंडने पहिला सामन्यात विजय मिळवला होता. तर, दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाने इंग्लंडला मात दिली होती. तिसऱ्या सामन्यासाठी इंग्लंडने आपल्या संघात एक बदल केला आहे. पहिल्या दोन सामन्यात खेळणारा युवा वेगवान गोलंदाज जोश टंग याच्या जागी अनुभवी जोफ्रा आर्चर (Jofra Archer) याची निवड केली गेली. आर्चर तब्बल 1596 दिवसानंतर म्हणजेच चार वर्षांनंतर कसोटी सामना खेळताना दिसेल. दुसरा वेगवान गोलंदाज गस ऍटकिन्सन याच्या निवडीची शक्यता होती. मात्र, त्याला संघात स्थान मिळू शकले नाही. (Latest Cricket News)

लॉर्ड्स कसोटीसाठी इंग्लंडची प्लेईंग इलेव्हन- झॅक क्राऊली, बेन डकेट, ओली पोप, जो रूट, हॅरी ब्रूक, बेन स्टोक्स (कर्णधार), जेमी स्मिथ (यष्टीरक्षक), ख्रिस वोक्स, ब्रायडन कार्स, जोफ्रा आर्चर व शोएब बशीर.

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप

हे देखील वाचा: नवख्या Italy Cricket Team ने रचला इतिहास! टी20 विश्वचषक अवघ्या एका पावलावर

Exit mobile version