Breaking News

नवख्या Italy Cricket Team ने रचला इतिहास, टी20 विश्वचषक अवघ्या एका पावलावर

italy cricket team
Photo Courtesy: X

Italy Cricket Team Beat Scotland In T20 World Cup Europe Qualifier 2025: टी20 विश्वचषक 2026 (T20 World Cup 2026) साठी खेळल्या जात असलेल्या टी20 विश्वचषक युरोप क्वालिफायर 2025 (T20 World Cup Europe Qualifier 2025) स्पर्धेत मोठा उलटफेर पाहायला मिळाला. कमजोर समजल्या जात असलेल्या इटली संघाने अनुभवी स्कॉटलंडला पराभूत करत इतिहास रचला. यासह इटली टी20 विश्वचषक स्पर्धेत प्रवेश करण्यापासून केवळ एक पाऊल दूर आहे.

Italy Cricket Team Beat Scotland In T20 World Cup Europe Qualifier 2025

नेदरलँड्स येथे खेळल्या जात असलेल्या या स्पर्धेत इटली संघाने प्रथम फलंदाजी करताना 6 बाद 167 अशी धावसंख्या उभारली. सलामीवीर एमिलियो गे याने केवळ 21 चेंडूंमध्ये 50 धावा केल्या. तर ग्रॅंट स्टीवर्ट याने 44 धावांचे योगदान दिले. या धावांचा बचाव करताना अष्टपैलू हॅरी मनेटी याने पाच बळी घेत स्कॉटलंडला 155 धावांवर रोखले. यासह त्यांनी 3 सामन्यात दोन विजय मिळवून 5 गुण कमावले आहेत. अखेरच्या सामन्यात विजय मिळवल्यास किंवा इतर संघ पराभूत झाल्यास ते विश्वचषकात खेळताना दिसतील.

पात्रता फेरीत इटली व स्कॉटलंडसह नेदरलँड, जर्सी व गर्नी हे संघदेखील सहभागी झाले आहे. यातील गर्नी संघ सलग तीन सामने गमावून स्पर्धेतून बाहेर पडला आहे. गुणतालिकेत अव्वल दोन स्थानी राहणाऱ्या संघांना विश्वचषकासाठी प्रवेश मिळेल.

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप

हे देखील वाचा: Lords Test साठी इंग्लंडने जाहीर केली प्लेईंग इलेव्हन! तब्बल 1596 दिवसानंतर कसोटी संघात दिसणार हा दिग्गज

Exit mobile version