Breaking News

संघ विकणे आहे! IPL 2025 आधी या संघाला मिळणार नवा मालक, किंमत थेट अब्जांमध्ये

ipl 2025
Photo Courtesy: X

New Owner For Gujarat Titans Before IPL 2025:  जगातील सर्वात मोठी आणि श्रीमंत टी20 लीग असलेल्या इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएलबाबत एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. आयपीएलमधील सर्वात नवीन संघ असलेल्या गुजरात टायटन्स (Gujarat Titans) संघाला लवकरच नवा मालक मिळण्याची शक्यता दिसून येते. मूळ मालक असलेल्या सीव्हीसी कॅपिटल (CVC Capital) ने आपली मालकी काढून घेण्याचा निर्णय घेतला आहे (New Owner For Gujarat Titans Before IPL 2025).

एका प्रमुख वृत्तसंस्थेने दिलेल्या बातमीनुसार, सीव्हीसी कॅपिटल लवकरच गुजरात टायटन्स संघाची मालकी सोडेल. आपली मालकी विकण्यासाठी ते अदानी ग्रुप व टोरेंट ग्रुप यांच्याशी चर्चा करत आहे. संघाचे सर्व व्हॅल्यू ही 1.5 अब्जांपर्यंत पर्यंत जाऊ शकते. सीव्हीसी कॅपिटलने 2021 मध्ये 5625 कोटी रुपयांमध्ये संघाचा मालकी हक्क मिळवला होता. त्यावेळी अदानी ग्रुपने 5100 इतकी दुसऱ्या क्रमांकाची बोली लावलेली. तर, 4653 कोटी रुपयांपर्यंत सहभाग नोंदवलेला.

आयपीएल व बीसीसीआयच्या नियमानुसार, कोणताही संघ चार वर्षानंतर आपला मालकी हक्क सोडू शकतो. गुजरात फ्रॅंचायजीचा हा लॉक इन पिरेड फेब्रुवारी 2025 मध्ये समाप्त होत आहे. तत्पूर्वी, सीव्हीसी कॅपिटल आपल्या मालकीतील मोठा हिस्सा विकतील. तर, फेब्रुवारीनंतर पूर्ण मालकी सोडून देतील.

गुजरात टायटन्सने 2022 मध्ये आपल्या पहिल्याच हंगामात विजेतेपद जिंकण्याची करामत केली होती. त्यानंतर दुसऱ्या हंगामात ते अंतिम फेरीपर्यंत पोहोचले. यानंतर संघाचा कर्णधार हार्दिक पंड्या याने संघाची साथ सोडली. हार्दिक मुंबई इंडियन्सचा भाग झाल्यामुळे शुबमन गिल याला नव्याने कर्णधार बनवण्यात आले. मात्र, आयपीएल 2024 मध्ये गुजरात संघ सातव्या स्थानी राहिला. आयपीएल 2025 पूर्वी संघात काय बदल होतील हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

(New Owner For Gujarat Titans Before IPL 2025)

टीम इंडियाच्या अष्टपैलूने बांधली लग्नगाठ! चार दिवसांनंतर झाले जगजाहीर, पत्नी म्हणून हिमाचलची…

Exit mobile version