Breaking News

Delhi Capitals ने घेतला मोठा निर्णय! केवळ 80 सामन्यांचा अनुभव असलेल्या ‘या’ दोघांकडे सोपवला संघ, गांगुलीलाही हटवले

delhi capitals
Photo Courtesy: X/Delhi Capitals

Delhi Capitals: आयपीएल 2025 (IPL 2025) साठी संघांनी तयारी सुरू केली आहे. ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस सर्व संघांना आपल्या रिटेन खेळाडूंची यादी द्यावी लागेल. तत्पूर्वी, दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) संघाने आपल्या सपोर्ट स्टाफमध्ये महत्त्वाचे बदल केले ‌आहेत. संघाचा संचालक व मुख्य प्रशिक्षक हे दोन्ही पदे भारताचे माजी क्रिकेटपटू सांभाळतील.

दिल्ली कॅपिटल्स संघाने यापूर्वीच मुख्य प्रशिक्षक रिकी पॉंटिंग याला नारळ दिला होता. त्यानंतर आता संचालक सौरव गांगुली यांच्याकडून देखील हे पद काढून घेण्यात आले आहे. गांगुली आता केवळ दिल्ली कॅपिटल्सच्या महिला संघाचे व एसए टी20 लीगमध्ये प्रिटोरिया कॅपिटल्स संघाचे संचालक असतील.

दिल्लीचे नवे मुख्य प्रशिक्षक म्हणून भारताचे माजी क्रिकेटपटू हेमांग बदानी हे काम पाहणार आहेत. बदानी यांनी भारतासाठी 4 कसोटी व 40 वनडे सामने खेळले. मात्र, प्रशिक्षक म्हणून त्यांची कारकीर्द उत्तम राहिली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली दिंडीगुल ड्रॅगन संघाने चार वेळा टीएनपीएल विजेतेपद पटकावले असून, दोन वेळच्या एसए टी20 लीग विजेत्या ईस्टन केप सनरायझर्स संघाचे ते प्रशिक्षक होते. याव्यतिरिक्त सनरायझर्स हैदराबाद संघाचे सहाय्यक प्रशिक्षक म्हणून त्यांनी काम पाहिलेले.

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप 

गांगुली यांच्या जागेवर संचालक म्हणून भारताचा माजी क्रिकेटपटू वेणुगोपाल राव (Venugopal Rao) हा काम पाहिल. त्याने भारतासाठी केवळ 16 वनडे सामने खेळले आहेत. तर, आयपीएल मध्ये तो दिल्ली डेअरडेविल्स व डेक्कन चार्जेस संघांचा भाग होता.

आयपीएल 2025 आधी दिल्ली रिषभ पंत, अक्षर पटेल व कुलदीप यादव यांना रिटेन करू शकते. तर ट्रिस्टन स्टब्स, जॅक फ्रेझर-मॅकगर्क व अभिषेक पोरेल यांच्यासाठी आरटीएम कार्ड वापरण्याची शक्यता आहे. आगामी हंगामात दिल्ली आपल्या पहिल्या विजेतेपदासाठी प्रयत्न करताना दिसेल.

(Delhi Capitals Appoint Hemang Badani As Head Coach)

IND v NZ: ये रे माझ्या मागल्या… न्यूझीलंडने 46 धावांत उडवला टीम इंडियाचा खुर्दा, हेन्री-ओ’रोर्क पुढे घातले लोटांगण

 

Exit mobile version