Breaking News

निवृत्त क्रिकेटपटूंवर BCCI करणार कारवाई? केंद्र सरकारने केली सूचना, वाचा संपूर्ण प्रकरण

bcci
Photo Courtesy: X/BCCI

BCCI: जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड असलेल्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआय (BCCI) ची मोठ्या प्रमाणात जाहिरातींमधून कमाई होत असते. यामध्ये अनेक प्रकारच्या जाहिराती बीसीसीआय आंतरराष्ट्रीय सामन्यांदरम्यान स्टेडियममध्ये लावत असते. त्यापैकीच आता तंबाखूजन्य पदार्थांच्या जाहिरातींवर बंदी येऊ शकते.

भारत सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने बीसीसीआयला एक पत्र लिहिले आहे. यामध्ये सामन्यांच्या वेळी स्टेडियमवर लावण्यात येणाऱ्या तंबाखूजन्य पदार्थ, गुट’खा अथवा सिगा’रेट यांच्या जाहिराती न लावण्याबाबत सुचवले आहे. यासोबतच माजी क्रिकेटपटू व वर्तमान क्रिकेटपटू यांना देखील अशा जाहिराती करण्यापासून रोखण्याचा पर्याय सुचवला आहे. आता बीसीसीआय यावर काय भूमिका घेते हे पाहावे लागेल.

सध्या अनेक वेळा स्टेडियममध्ये नामांकित ब्रँडच्या तंबाखूजन्य अथवा पान मसाला जाहिराती दिसून येतात. तर अनेक माजी क्रिकेटपटू अशा जाहिरातींमध्ये त्या उत्पादनाचे प्रमोशन करताना दिसत आहेत. याचा सामान्य चाहत्यांवर प्रभाव पडून ते या व्यसनांच्या आहारी जाऊ शकतात अशी भीती आरोग्य मंत्रालयाने व्यक्त केली आहे. त्यामुळे त्यांनी बीसीसीआय पुढे हा पर्याय सुचवला.

मागील वर्षी भारताचे महान फलंदाज सुनील गावसकर व वीरेंद्र सेहवाग यांच्या अशाच एका जाहिरातीमुळे मोठा वाद निर्माण झाला होता. त्या दोघांना देखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल केले गेलेले. तसेच भारताचा विद्यमान मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर याने देखील या प्रकरणावर वादग्रस्त टिप्पणी केली होती.

(Heath Ministry Want Restrict Tobacco Ads In Cricket Stadium Suggest To BCCI)

Exit mobile version