Breaking News

IND v BAN: कानपूर कसोटीसह मालिका टीम इंडियाच्या खिशात! दोन दिवसांत बांगलादेशने टाकल्या नांग्या

ind v ban
Photo Courtesy: X

IND v BAN Kanpur Test: भारत आणि बांगलादेश (IND v BAN) यांच्या दरम्यान खेळल्या गेलेल्या कानपूर कसोटी (Kanpur Test) मध्ये भारतीय संघाने पाचव्या दिवशी सहज विजय साकार केला. बांगलादेशचा दुसरा डाव गुंडाळल्यानंतर विजयासाठी मिळालेले 95 धावांचे आव्हान भारतीय संघाने 3 गडी गमावत पार केले. यासह भारतीय संघाने मालिका 2-0 अशा फरकाने खिशात घातली. सलामीवीर यशस्वी जयस्वाल (Yashasvi Jaiswal) याला सामनावीर पुरस्कार देण्यात आला. तर, मालिकावीर म्हणून रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) याला मालिकावीर म्हणून निवडले गेले.

सामन्याच्या पाचव्या दिवशी बांगलादेशने 2 बाद 26 या धावसंख्येवरून पुढे खेळण्यास सुरुवात केली. नाईट वॉचमन हसन याला अश्विनने तंबू चा रस्ता दाखवला. त्यानंतर शदमन व कर्णधार शांतो यांच्या दरम्यान अर्धशतकी भागीदारी झाली. परंतु, जडेजाने गोलंदाजीला आल्यावर केवळ तीन धावांत तीन गडी बाद करत, भारतीय संघाला पुढे केले. मुशफिकुर रहीम याने 37 धावांची खेळी करत थोडाफार संघर्ष केला. मात्र, अश्विन, बुमराह व जडेजा यांनी प्रत्येकी तीन बळी घेत त्यांचा डाव 146 धावांवर संपवला.

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप 

विजयासाठी मिळालेल्या 95 धावांचा पाठलाग करताना कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) व यशस्वी जयस्वाल यांनी पुन्हा एकदा दमदार सुरुवात केली. मात्र, रोहित व त्यानंतर गिल हे तंबूत परतले. यशस्वी याला विराट कोहलीने चांगली साथ देत अर्धशतकी भागीदारी केली. याच दरम्यान जयस्वाल याने मालिकेतील आपले तिसरे अर्धशतक झळकावले. विजयासाठी चार धावा शिल्लक असताना तो बाद झाला. अखेर विराट व पंत यांनी विजयाची पूर्तता केली.

सामन्याच्या पहिल्या दिवशी केवळ 35 षटकांचा खेळ होऊ शकला होता. त्यानंतर दुसऱ्या व तिसऱ्या दिवशी एकाही चेंडूचा खेळ झाला नाही. चौथ्या दिवशी मात्र भारतीय संघाने बांगलादेशला 233 धावांवर सर्वबाद केल्यानंतर, केवळ 34 षटकात 285 धावा करत, या सामन्यात रंगत आणली होती. भारतीय संघाने मालिकेतील पहिला सामना देखील आपल्या नावे केलेला.

(IND v BAN India Clean Sweep Bangladesh In Test Series)

 हे देखील वाचा: IND v BAN: कानपूरमध्ये टीम इंडियाची ‘गुलीगत’ बॅटिंग! करून दाखवली 147 वर्षांच्या क्रिकेट इतिहासात कोणाला न जमलेली कामगिरी

Exit mobile version