Breaking News

पाकिस्तानच्या पराभवासह Womens T20 World Cup मधून टीम इंडियाचीही एक्झिट, न्यूझीलंड सेमी-फायनलमध्ये

womens t20 world cup
Photo Courtesy: X/BCCI Women

Womens T20 World Cup 2024: युएई येथे होत असलेल्या महिला टी20 विश्वचषक 2024 (Womens T20 World Cup) स्पर्धेतून भारतीय संघ बाहेर पडला आहे. न्यूझीलंड महिला विरुद्ध पाकिस्तान महिला (NZW v PAKW) या सामन्यात पाकिस्तान संघाला पराभूत व्हावे लागल्याने, भारतालाही मायदेशाचे तिकीट काढावे लागले. पाकिस्तान संघाने विजय मिळवला असता तर, भारतीय संघ सरस धावगतीच्या जोरावर उपांत्य फेरीत पोहोचला असता. आता अ गटातून ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड यांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.

साखळी फेरीत आपले दोन सामने गमावल्यामुळे भारतीय संघाला या सामन्यात पाकिस्तानच्या विजयाची प्रार्थना करावी लागत होती. मात्र, पाकिस्तानला 111 धावांचे आव्हानही पेलवले नाही. परिणामी, पाकिस्तानसह भारतही स्पर्धेतून बाहेर झाला. या गटातून यापूर्वी श्रीलंका बाहेर पडली आहे.

ब गटातून दोन स्थानांसाठी इंग्लंड, वेस्ट इंडिज व दक्षिण आफ्रिका यांच्या दरम्यान चुरस आहे. इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील अखेरच्या साखळी सामन्यानंतर उपांत्य फेरीचे चित्र स्पष्ट होईल. या गटातून बांगलादेश व स्कॉटलंड हे बाहेर पडले आहेत. परिणामी, उपांत्य फेरीत एकही आशियाई संघ दिसणार नाही.

भारतीय संघाला ऑस्ट्रेलिया व न्युझीलँड यांच्याविरुद्ध पराभूत व्हावे लागले होते. तर, पाकिस्तान व श्रीलंका यांना मात देण्यात त्यांना यश आलेले. भारतीय संघ मागील विश्वचषकात उपांत्य फेरीत पराभूत झाला होता. तर, 2020 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला हरवत विजेतेपद जिंकले होते.

(India Out Of Womens T20 World Cup 2024 After Pakistan Loss)

Womens T20 World Cup: भारतीय क्रिकेटप्रेमींचा हार्ट ब्रेक! थरारक सामन्यात ऑस्ट्रेलियाचा विजय

Exit mobile version