Breaking News

भारताला आणखी एका वर्ल्डकपचे यजमानपद! 2025 मध्ये होणार जंगी आयोजन

fih hockey junior world cup 2025
Photo Courtesy: X/FIH

India Host FIH Hockey Junior World Cup 2025|भारतीय हॉकी प्रेमींसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघ (FIH) यांनी मंगळवारी (11 जून) भारताला 2025 एफआयएच हॉकी ज्युनियर वर्ल्डकप (FIH Hockey Junior World Cup 2025) चे यजमानपद बहाल केले. 2013 नंतर भारत या स्पर्धेचे चौथ्यांदा आयोजन करत आहे. एफआयएच अध्यक्ष तय्यब इक्रम यांनी याबाबतची घोषणा केली.

भारताने यापूर्वी 2013 मध्ये दिल्ली, 2016 मध्ये लखनऊ व 2021 मध्ये भुवनेश्वर येथे या विश्वचषकाचे आयोजन केले होते. पुढील विश्वचषकाचे आयोजन आता राऊरकेला येथील बिरसा मुंडा आंतरराष्ट्रीय हॉकी स्टेडियम (Birsa Munda Hockey Stadium) येथे होऊ शकते. नव्याने बांधण्यात आलेले हे स्टेडियम जगातील सर्वात मोठे हॉकी स्टेडियम मानले जाते.

ज्युनियर हॉकी विश्वचषकात यावेळी प्रथमच 24 संघ सहभागी होतील. भारताला या स्पर्धेचे यजमानपद मिळाल्यानंतर हॉकी इंडियाचे अध्यक्ष दिलीप तिर्की म्हणाले,

“आम्ही आंतरराष्ट्रीय हॉकी संघाचे आभारी आहोत की, त्यांनी आम्हाला ही संधी दिली आहे. ही मानाची स्पर्धा भारताचे जागतिक हॉकीमधील मानाचे स्थान अधोरेखित करते. आम्ही आपली उज्वल हॉकीची परंपरा जगाला दाखण्यासाठी उत्सुक आहोत.”

भारताने आत्तापर्यंत ही स्पर्धा दोनदा जिंकली आहे. भारताने 2001 मध्ये ऑस्ट्रेलियात व 2016 मध्ये यजमान असताना स्पर्धा आपल्या नावे केली होती. आतापर्यंत जर्मनीने सर्वाधिक सात वेळा ज्युनियर विश्वचषक जिंकला आहे. भारताप्रमाणेच अर्जेंटिनाने दोनदा तर पाकिस्तानी एकदा हा विश्वचषक उंचावलाय. सध्या जर्मनी या स्पर्धेचे गतविजेते आहेत.

(India Will Host FIH Hockey Junior World Cup 2025)

T20 World Cup : “बाबर आझम आणि टीमने महिला संघासोबत क्रिकेट खेळायला हवे”, माजी पाकिस्तानी दिग्गजाचा खोचक टोला

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version