
Mumbai Indians Signed Allrounder Ahead IPL 2026 Retention: आयपीएल 2026 रिटेन्शनसाठी अवघ्या दोन दिवसांचा अवधी शिल्लक आहेत. मागील अनेक दिवसांपासून विविध संघ खेळाडू ट्रेड करणार असल्याच्या बातम्या समोर येतायेत. आता पाच वेळच्या विजेत्या मुंबई इंडियन्स संघाने देखील आपल्या ताफ्यात नवा अष्टपैलू सामील केल्याचे वृत्त येत आहे. विशेष म्हणजे त्या बदल्यात सचिन तेंडुलकर याचा मुलगा अर्जुन तेंडुलकर (Arjun Tendulkar) याला ट्रेड केल्याचे सांगण्यात येतेय.
Mumbai Indians Signed Shardul Thakur Ahead IPL 2026
भारताचा माजी फिरकीपटू रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) याने एका व्हिडिओ चॅटमध्ये बोलताना अचानक एका गोष्टीचा खुलासा केला. यामध्ये तो म्हणताना दिसला, “शार्दुल ठाकूरचा ट्रेड मुंबईकडे झाला आहे. त्यामुळे त्यांची गोलंदाजी धारदार बनलीये.”
अश्विन व शार्दुल चांगले मित्र असल्याने, ही गोष्ट अगदी खरे असल्याचे मानले जातेय. मागील लिलावात अनसोल्ड राहिल्यानंतर शार्दुल बदली खेळाडू म्हणून लखनऊ सुपरजायंट्स संघाचा भाग बनला होता. पहिल्या दोन सामन्यात त्याने चांगली गोलंदाजी केली होती. मात्र, त्यानंतर तो पुन्हा एकदा महागडा ठरला. शार्दुलला लखनऊने त्याच्या दोन कोटी इतक्या बेस प्राईजवर खरेदी केलेले. त्यामुळे ट्रेडमध्ये त्याला हीच रक्कम देण्यात येईल.
यासोबतच मिळत असलेल्या माहितीनुसार, युवा अष्टपैलू अर्जुन तेंडुलकर हा लखनऊ संघाचा भाग बनेल. अर्जुन केवळ तीस लाखांच्या बेस प्राईजवर नव्या संघाचा भाग होईल.
Latest Sports News In Marathi
जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप
हे देखील वाचा: WTC च्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार Freedom Trophy 2025! जगज्जेत्यांना रोखणार का टीम इंडिया?