Breaking News

न्यूझीलंडच्या शिरावर Womens T20 World Cup 2024 चा ताज! द. आफ्रिकेच्या महिलाही फायनलमध्ये चोक

WOMENS T20 WORLD CUP 2024
Photo Courtesy: X/ICC

Womens T20 World Cup 2024 Final: महिला टी20 विश्वचषक 2024 (Womens T20 World Cup 2024) च्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिका व न्यूझीलंड (SAW v NZW) आमने-सामने होते. पहिल्या विजेतेपदाच्या शोधात असलेल्या या दोन्ही संघातील सामन्यात न्यूझीलंडने सरशी साधत प्रथमच महिला टी20 क्रिकेटमधील विश्वचषक जिंकण्याचा कारनामा केला. तर, दक्षिण आफ्रिकेला पुरुष संघाप्रमाणेच अंतिम फेरीत पराभूत व्हावे लागले.

Womens T20 World Cup 2024 Winner New Zealand

उपांत्य फेरीत शानदार विजय मिळवून अंतिम फेरी खेळण्यासाठी उतरलेल्या या संघांत न्यूझीलंडला प्रथम फलंदाजीची संधी मिळाली. अनुभवी सलामीवीर सुझी बेट्स हिने 32 धावांची शानदार खेळी केली. एमिलीया कर हिने सर्वाधिक 43 धावा केल्या. तर, ब्रुक हॅलिडेने आक्रमक 38 धावा करत संघाला 154 पर्यंत मजल मारून दिली.

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप

विजयासाठी 155 धावांचे आव्हान मिळालेल्या दक्षिण आफ्रिकेला चांगली सुरुवात मिळाली. कर्णधार लॉरा वॉल्वर्ट व स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या तझ्मिन ब्रिट्स यांनी सहा षटकात 51 धावा केल्या. त्यानंतर मात्र न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी सामन्यात पुनरागमन केले. पुढील 27 धावात दक्षिण आफ्रिकेने आपले पाचही प्रमुख फलंदाज गमावले. शेवटच्या सात षटकात 78 धावांचे मोठे आव्हान दक्षिण आफ्रिकेच्या इतर फलंदाजांना पेलवले नाही.

न्यूझीलंड महिला संघ यापूर्वी 2009 व 2010 मध्ये टी20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत खेळला होता. मात्र, त्यावेळी त्यांना ऑस्ट्रेलियाने पराभूत केलेले. विशेष म्हणजे, न्यूझीलंडच्या पुरुष संघालाही आतापर्यंत कोणताही विश्वचषक जिंकता आलेला नाही. तर महिला संघाने 2000 मध्ये वनडे विश्वचषक आपल्या नावे केला होता.

(Newzealand Womens Won Womens T20 World Cup 2024)

हे देखील वाचा:IND v NZ: न्यूझीलंडने सोडवला पराभवाचा फेरा! 36 वर्षानंतर भारतभूमीत मिळवला कसोटी विजय

Exit mobile version