Breaking News

Gary Kirsten : ‘माझ्या करिअरमध्ये मी असा संघ पाहिला नाही’, कोच गॅरी कर्स्टनची पाकिस्तान संघावर सडकून टीका

Gary Kirsten : टी20 विश्वचषक 2024 (T20 World Cup 2024) मधून बाहेर पडल्यानंतर बाबर आझमच्या नेतृत्त्वाखालील पाकिस्तान संघावर जोरदार टीका होत आहे. पाकिस्तानने साखळी फेरीत अमेरिका आणि भारताविरुद्धचे सामने गमावले. तर कॅनडा आणि आयर्लंडविरुद्ध त्यांना जेमतेम विजय मिळवता आला. 2022च्या टी20 विश्वचषकाचा उपविजेता राहिलेल्या पाकिस्तान संघाची अलीकडच्या काळातली ही सर्वात वाईट कामगिरी होती. दरम्यान पाकिस्तान संघाच्या या हाराकिरीमागे कोणती कारणे होती?, याचा खुलासा करताना मुख्य प्रशिक्षक गॅरी कर्स्टन (Gary Kirsten) यांनी संघावर सडकून टीकाही केली आहे.

पाकिस्तानी संघात फूट पडल्याच्या चर्चा सुरू असतानाच, पाकिस्तान क्रिकेट संघ एकसंध नाही. आपल्या प्रदीर्घ प्रशिक्षक कारकिर्दीत कोणत्याही संघात आपण अशी परिस्थिती पाहिली नसल्याचे प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांनी सांगितले आहे.

‘पाकिस्तान संघात एकी नाही’
‘पाकिस्तान संघात एकता नाही. ते त्याला संघ म्हणतात, पण तो संघ नाही. संघात मोठ्या प्रमाणात दुफळी असून गटबाजी आहे. खेळाडू एकमेकांना साथ देत नाहीत. प्रत्येकजण वेगवेगळा असल्यासारखा वागतो. मी अनेक संघांसोबत काम केले आहे, पण अशी परिस्थिती कधीच पाहिलेली नाही,’ अशा तीव्र शब्दांत गॅरी कर्स्टनने टीका केल्याचे वृत्त आहे.

‘पाकिस्तान संघात फिटनेसचा अभाव’
तसेच कर्स्टनने खेळाडूंच्या फिटनेसवरही नाराजी व्यक्त केली. दक्षिण आफ्रिकेच्या माजी सलामीवीराने असेही सांगितले की, हा संघ कौशल्य पातळीच्या बाबतीत उर्वरित जगापेक्षा खूप मागे आहे, असे ते म्हणालेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version